Mon, Jul 06, 2020 11:53होमपेज › Solapur › अन्नछत्र मंडळातर्फे भक्‍तांसाठी व्यायामशाळेची स्थापना

अन्नछत्र मंडळातर्फे भक्‍तांसाठी व्यायामशाळेची स्थापना

Published On: May 07 2018 2:05AM | Last Updated: May 05 2018 10:29PMअक्कलकोट : वार्ताहर

अक्कलककोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने महाप्रसादाबरोबरच विविध उपक्रम राबवित मुक्कामी असणार्‍या परगावच्या भक्तांसाठी सकाळ-संध्याकाळ  व्यायाम करता यावा यासाठी मंडळातच खुल्या व्यायामशाळेची स्थापना केल्याने अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या कार्याचे कौतुक व स्वागत होत आहे. खुल्या व्यायामशाळेचे (ऑऊटडोअर जिम) मंडळाच्या प्रागंणात 1 मे रोजी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून भरत मित्रमंडळ पुण्याचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब धाबेकर यांच्या हस्ते करण्यात आले.  

याप्रसंगी अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले, श्री वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्‍वस्त अमोलराजे भोसले, उद्येागपती संदीप फुगे (पुणे), शिरीष मावळे (पुणे), सचिव शाम मोरे, उपाध्यक्ष अभय खोबरे, खजिनदार रविंद्र भंडारे, दिलीप सिध्दे, जिम प्रशिक्षक राजकुमार ढेपे आदी उपस्थित होते.  अन्नछत्र मंडळात येणार्‍या परगावच्या स्वामीभक्त, आबालवृध्दांसह महिला व नागरिकांना सकाळ-सायंकाळ व्यायाम करता यावा यासाठी या व्यायामशाळेत एकूण 9 प्रकारचे यंत्र बसवण्यात आले आहेत. यामध्ये आठ प्रकारचे व्यायाम एकाच यंत्रावर एकाचवेळी आठ व्यक्ती व्यायाम करु शकतात. यात प्रामुख्याने छातीचा व्यायाम, खांद्या, पायाचा, मांड्यांचा, कंबरेचा, पाठीचा, पिंढरीचा, ज्याचे गुडघे दुखत असतात त्यांच्यासाठी, वॉकर चालण्याचा व्यायाम होतो. यामध्ये दुसरे मशीन ट्र्यूस्टर यामुळे पोट कमी करण्यासाठी, शोल्डर यंत्र, क्रॉसट्रेनर या यंत्रामुळे कंबर, पाय यासह हाताचा, पाठीचा संपूर्ण व्यायाम होतो. बॅक यंत्र पाठीच्या कणाचा व्यायाम, डबलबार, पुलअप, छातीचे स्नायू व उंची वाढवण्यासाठी, अ‍ॅब पॅड पोटाचे स्नायू,  6 पॅकसाठी, स्टेपर हॉर्स रायडर यामुळे मान, पायाचे पंजे व मांड्याच्या मागील बाजूस चरबी वाढलेली असती ते कमी होण्यास मदत 
होते. 

प्रामुख्याने हे सर्व मशिन सर्वांसाठी काही वेळेला वेळेअभावी किंवा काही कारणास्तव जिममध्ये जाऊ शकत नाही आणि जिममध्ये वजन उचलणे जमत नाही, निरोगी व उत्तम आरोग्य राहण्यासाठी अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी महाप्रसादाबरोबरच खुल्या व्यायामशाळेची स्थापना केलेली आहे. त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख, कार्यकारी विश्‍वस्त अमोलराजे भोसले यांनी केले आहे.