Thu, Aug 22, 2019 04:28होमपेज › Solapur › ‘श्री विठ्ठल’मध्ये इलेक्ट्रिकल अभ्यासक्रमास मान्यता

‘श्री विठ्ठल’मध्ये इलेक्ट्रिकल अभ्यासक्रमास मान्यता

Published On: May 08 2018 10:40PM | Last Updated: May 08 2018 10:02PM पंढरपूर :  प्रतिनिधी

 श्री. विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयास पदवी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमास मान्यता मिळाली असून सिव्हिल इंजिनिअरिंगच्या जागांमध्येही वाढीच्या प्रस्तावास शासनाने  मान्यता दिल्याची माहिती  स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  श्री. विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना डॉ.रोंगे म्हणाले की, पदवी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग ही नवीन शाखा 60 प्रवेश क्षमतेसह सुरू  करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.त्याचबरोबर सिव्हिल इंजिनिअरिंगची क्षमता 60 वरून 120 करण्यासही शासनाने मान्यता दिली आहे.

श्री. विठ्ठल इंजिनिअरिंग महाविद्यलयाची प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता आता 420 वरून वाढून 540 इतकी झाली आहे.त्यामुळे स्वेरीत पदवी इलेक्ट्रिकल  अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी पूर्वी 60 जागा होत्या आता त्या वाढून 120 करण्यात आल्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या जादा 60 विद्यार्थ्यांना  प्रवेश मिळणार आहे. इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग विभाग पूर्वी डिप्लोमाकडे होता. त्यामुळे डिग्री इंजिनिअरिंगकडे देखील इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग विभाग असावा अशी पालकांची मागणी होती. त्यामुळे डिप्लोमा इलेक्ट्रिकल उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आता पदवी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची झालेली सोय व सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी वंचित राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आणखी 60 जागा वाढलेल्या आहेत. यामुळे स्वेरीवर लक्ष ठेवणार्‍या बारावी सायन्स परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अधिक आनंद झाला  आहे.

तंत्रशिक्षणातील सर्वोत्तम निकष मानला जात असलेल्या एन.बी.ए. मानांकन असलेले स्वेरी हे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय आहे. त्याचबरोबर महाविद्यालयात नॅक मानांकनही मिळालेले आहे. राज्यात 50 टक्के पेक्षा जास्त कॅम्पस प्लेसमेंट असणार्‍या 45 महाविद्यालयांमध्ये स्वेरीचाही समावेश असल्याचे डॉ. रोंगे यांनी सांगितले.या वेळी संस्थेचे ज्येष्ठ विश्‍वस्त दादासाहेब रोंगे, संशोधनविभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, वसतिगृह व्यवस्थापक प्रा. एम.एम. पवार, प्रा. यू. एल.अनुसे संतोष हलकुडे आदी उपस्थित 
होते.