Mon, Jul 15, 2019 23:54होमपेज › Solapur › उपसा सिंचन पूर्णत्वासाठी प्रयत्न : ना. देशमुख

उपसा सिंचन पूर्णत्वासाठी प्रयत्न : ना. देशमुख

Published On: May 07 2018 2:05AM | Last Updated: May 06 2018 10:33PMवैराग : प्रतिनिधी  

वैराग भागातील शेतकरी केंद्रबिंदू मानून अतिशय कल्पकतेने बार्शी तालुका उपसा सिंचन योजनेतील अतिरिक्त शिल्लक पाणी मिळविण्यासाठी आखलेली योजना स्वागतार्ह आहे. ही मागणी पूर्णत्वास नेण्यासाठी शासन राजेंद्र मिरगणेंच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. वैराग येथे श्री शिवाजी चौकात आयोजित भव्य पाणी परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.  भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजीराव पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्र.का. सदस्य अविनाश कोळी, भाजपा नेते राजेंद्र मिरगणे, जिल्हा सरचिटणीस धनंजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अरुणभाऊ कापसे, शिक्षणमहर्षी बाळासाहेब कोरके, तालुकाध्यक्ष बिभिषण पाटील, तालुका सरचिटणीस बाळासाहेब पवार व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी देशमुख म्हणाले, राज्यातील सर्वच सिंचन प्रकल्प मार्गी लावण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्र्यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांना उत्पादन खर्चापेक्षा दीडपट भाव मिळाला पाहिजे, यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. 

यावेळी प्रास्ताविकामध्ये पाणी परिषदेची भूमिका मांडताना राजेंद्र मिरगणे म्हणाले, बार्शी उपसा सिंचन योजनेसाठी उजनी धरणामधून 2 59 टी.एम.सी. इतके पाणी उपलब्ध असून त्यावर बार्शी तालुक्यातील 15000 हेक्टर (32500 एकर) क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यापेक्षा अतिरिक्त (जादा) पाणी उजनीमधून मिळणे भविष्यातही शक्य नाही. उघड्या खोदलेल्या कालव्यानंतर नियोजित खोदावयाचे उपकालवे, शाखा कालवे, वितरीका, (वितरण व्यवस्था) ऐवजी आधुनिक पध्दतीने बंद पाईपलाईनव्दारे शेतीस पाणीपुरवठा केल्यास बार्शी तालुक्यातील ओलिताखाली येणार्‍या नियोजित 15000 हे. क्षेत्रास कसलीही बाधा न येता बाष्पीभवन व परक्यूलेशनमुळे वाया जाणारे 30% ते 35% पाण्याची नासाडी टाळून पाणी बचत होऊ शकते.

नेहमीप्रमाणे आपल्या निष्क्रियतेमुळे भविष्यात हे बचतीचे पाणी तालुक्याबाहेरील पुढार्‍यांनी पळवून नेण्याअगोदर आपल्या हक्काचे हे पाणी वैराग परिसरातील शेतीसाठी वापरल्यास अतिरिक्त जवळपास 5000 हे. क्षेत्र ओलिताखाली येऊ  शकते. पावसाळ्यामध्ये उजनीतून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पावसाळ्यात या योजनेव्दारे भोगावती नदीवरील तसेच नागझरी नदीवर व छोट्या-मोठ्या नाल्यावरील बंधारे भरण्याबरोबरच मध्यम प्रकल्प, ल.पा.तलाव, पाझर तलाव भरण्यासाठीही उपयोग होऊ  शकतो.यावेळी ज्येष्ठ नेते सुभाष डुरे-पाटील, अरुणभाऊ कापसे, माजी नगरसेवक राजाभाऊ काकडे यांचीही भाषणे झाली. डॉ. भारत पंके यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.

Tags : Solapur, Effort, complete, irrigation