होमपेज › Solapur › जिल्ह्यात शिक्षणाचे प्रमाण फक्त साडेसात टक्के

जिल्ह्यात शिक्षणाचे प्रमाण फक्त साडेसात टक्के

Published On: Jun 16 2018 10:49PM | Last Updated: Jun 16 2018 10:06PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणापासून ते महाविद्यालय आणि पुढे विद्यापीठपर्यंत शिक्षणाची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. येथील शिक्षणाचे प्रमाण फक्त साडेसात टक्के आहे, असे मत सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केले.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघात शनिवार, 16 जून रोजी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा वार्तालाप आयोजित केला होता. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, शिक्षणात भारताचा 128 वा क्रमांक लागतो. कारण 
भारताचे प्राथमिक ते विद्यापीठापर्यंतचे शिक्षणाचे प्रमाण हे केवळ 9.2 टक्के आहे. उच्च शिक्षणातील गळतीचे प्रमाण वाढले आहे. तसेच संशोधनामुळे प्रगती होते. त्यामुळे शालेय शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांना संशोधनाचे ज्ञान मिळणे आवश्यक आहे. तसेच संशोधन हा शिक्षण क्षेत्राचा सर्वोच्च भाग आहे.सोलापुरातील शिक्षण क्षेत्राचा पाया भक्कम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  संशोधनासाठी वेगवेगळ्या अनेक योजना आहेत. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे होते. मास कम्युनिकेशन विभागाचे विभागप्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. नितीन ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. राहुल वंजारे यांनी 
आभार मानले.