Wed, Jun 26, 2019 17:26होमपेज › Solapur › लाभार्थी नसल्याने कृषी खात्याचा निधी वळविला

लाभार्थी नसल्याने कृषी खात्याचा निधी वळविला

Published On: Jan 22 2018 1:22AM | Last Updated: Jan 21 2018 10:22PMसोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेकडून घेण्यात येणार्‍या काही योजनांसाठी लाभार्थीच मिळत नसल्याने मागणी नसणार्‍या योजनेतील 36 लाख  70 हजार रुपयांचा अन्य योजनांकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जि.प. कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती मल्‍लिकार्जुन पाटील यांनी दिली. 

सभापती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा परिषदेत कृषी समितीची सभा घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. ताडपत्री, स्प्रे  पंप, शेंगाफोडणी मशीन यासाठी निधीची तरतूद असतानाही लाभार्थ्यांची मागणी नसल्याने या योजनेसाठी तरतूद असलेला हा निधी रोटावेटरसाठी वर्ग करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. 

स्प्रे पंपासाठी 400 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असताना 261 अर्ज आले आहेत. थ्री पिस्टन पंपासाठी 507 लाभार्थी उद्दिष्ट असताना 407  लाभार्थ्यांचे अर्ज आले आहेत. डबलपिस्टन पंपाकरीता 250 लाभार्थी उद्दिष्ट असताना 118 अर्ज प्राप्‍त झाले आहेत. शेंगाफोडणी मशीनसाठी 158 लाभार्थी उद्दिष्ट असताना 44 अर्ज प्राप्‍त झाले आहेत. त्यामुळे या योजनांचा निधी रोटावेटरसाठी वर्ग करण्यात आला आहे. रोटावेटरसाठी 80 चे उद्दिष्ट असतताना 194 लाभार्थ्यांचे अर्ज आले आहेत. त्यामुळे या योजनेसाठी हा निधी वाढविण्यात आला आहे. या बैठकीत विविध योजनांसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली. या समितीच्या बैठकीस समितीचे सदस्य गणेश पाटील, शुभांगी उबाळे, दिनकर नाईकनवरे, संगीता मोटे आदी उपस्थित होते. लाभार्थ्यांची यादी मंजूर केल्याने या लाभार्थ्यांनी पत्र मिळताच 15 दिवसांत संबंधित वस्तू खरेदी करुन त्याची पावती पंचायत समितीकडे सादर करावी, असे आवाहन सभापती पाटील यांनी केले आहे.