होमपेज › Solapur › पाणीपुरवठा विहिरीच्या वीज तारा धोकादायक स्थितीत

पाणीपुरवठा विहिरीच्या वीज तारा धोकादायक स्थितीत

Published On: Jun 28 2018 11:56PM | Last Updated: Jun 28 2018 8:40PMपंढरपूर : प्रतिनिधी

बोहाळी (ता.पंढरपूर) येथील गावाला पाणीपुरवठा करणार्‍या राजमाता अहिल्याबाई होळकर पाणीपुरवठा विहिरीवर पिण्याचे पाणी भरण्यासाठी येणार्‍या ग्रामस्थांना विजेच्या तारा हाताला स्पर्श होतील अशा पद्धतीने लोंबकळत असल्याने धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे वीज तारा उंचावरून टाकण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी अहिल्यादेवी होळकर विहीर आहे. या विहिरी लगत ग्रामदैवत महादेव मंदिर, मारुती मंदिर व श्रीरामाचे मंदिर असल्याने येथे लग्नसमारंभाच्या वेळी पारणे येत असल्याने व एखादा सांस्कृतिक कार्यक्रम, शासकीय  बैठका मंदिराच्या सभामंडपात होत असल्याने येथे ग्रामस्थांची गर्दी होते. सद्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसात वीज प्रवाह चालू राहिला तर येथे पाणी भरण्यासाठी येणार्‍या ग्रामस्थांना, कपडे धुण्यासाठी येणार्‍या महिलांसाठी धोकादायक ठरत आहे. येथे पाणी साठवण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या सिंटेक्स टाकी लगत वीज तारांची लाईन आहे. वारा सुटला तर वीज तारा हेलकावे खावून पाण्याच्या टाकीला स्पर्श करत आहेत. पावसात या वीज तारांमधून वीज प्रवाह उतरुन येथे पाणी भरण्यासाठी येणार्‍या ग्रामस्थांना धोकादायक ठरू शकते. त्यामुळे येथील या  तारा विज वितरण कंपनीने उंचावरुन ओढून घ्याव्यात अशी मागणी होत आहे.