Fri, Apr 26, 2019 16:17होमपेज › Solapur › वेळापूर येथे ट्रकखाली सापडून चालकाचा मृत्यू

वेळापूर येथे ट्रकखाली सापडून चालकाचा मृत्यू

Published On: Apr 25 2018 11:55PM | Last Updated: Apr 25 2018 10:33PMवेळापूर : वार्ताहर

वेळापूर (ता. माळशिरस) येथे बुधवारी पहाटे 4.30 च्या सुमारास  वेळापूर ते सांगोला रोडवर मारुती मंदिर पिसेवस्ती येथे चालकास झोपेचा डुलका लागल्याने 22 चाकी ट्रेलर रस्त्याच्या खाली जाऊन विजेच्या खांबाला धडकला. यात ट्रक चालकाचा चाकाखाली सापडून जागीच मृत्यु झाला. बाळासाहेब भगवान पवार असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बाळासाहेब पवार (रा.वाटंबरे ता. सांगोला) हा पुणे येथील महावीर रोड लाईन्सचा ट्रक क्रमांक (एम.एच. 12 आय.टी/2933) हा 22 चाकी ट्रकवर वाहन चालक म्हणून काम करत होता. 

या 22 चाकी ट्रेलरमध्ये रायगड जिल्हयातून लोखंडी कॉईल घेऊन बंगलोरकडे पुणे मार्ग चालला होता. सदर ट्रेलर वेळापूरनजीक बुधवारी पहाटे 4.30 वाजता आला असता चालकाला झोप लागल्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. सदर ट्रेलर रस्त्यावरून खाली मोकळ्या रानात घुसला. ट्रेलर विद्युत खांबाला जाऊन धडकल्याने चालक घाबरून जागा झाला. घाबरलेल्या चालकाने ट्रेलरमधून उडी मारीत असताना तो ट्रेलरच्या पाठीमागच्या चाकाखाली सापडला. या अपघाताची वेळापूर पोलीस स्टेशनला नोंद झाली असून अधिक तपास पीएसआय सदाशीव जगताप हे करीत आहेत.