Tue, Jul 16, 2019 23:53होमपेज › Solapur › १ लाख युवकांना रोजगार देण्याचे स्वप्न : अभिजित पाटील

१ लाख युवकांना रोजगार देण्याचे स्वप्न : अभिजित पाटील

Published On: Mar 21 2018 12:24AM | Last Updated: Mar 20 2018 11:32PM पंढरपूर :  प्रतिनिधी

उद्योग व्यवसाय सुरू करताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा डी.व्ही.पी. ग्रूपचा प्रयत्न असून 1 लाख युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आमचे स्वप्न आहे, असे प्रतिपादन डी.व्ही.पी. ग्रूपचे प्रमुख आणि युवा उद्योजक अभिजित पाटील यांनी व्यक्त केले. शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या  जयंतीच्या मुहूर्तावर डी.व्ही.पी. ग्रूपच्या डी.व्ही.पी. मार्टचा शुभारंभ वीरमाता सौ. वृंदाताई गोसावी, वीरपत्नी श्रीमती उमादेवी गोसावी, वीरपिता मुन्नागीर गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी पुढे बोलताना अभिजित पाटील पुढे म्हणाले की, सर्व मित्रांच्या सहकार्याने या उद्योगविश्‍वाची उभारणी करण्यात आली असून 2016 मध्ये डी.व्ही. पी. स्क्वेअरच्या इमारतीचे काम सुरू केले तर एप्रिल 2017 मध्ये या इमारतीमध्ये 2 स्क्रीन सुरू करण्यात आल्या. पुणे-मुंबईच्या धरतीवर डी.व्ही. पी. स्क्वेअर, मार्ट आणि कॉम्प्लेक्सची  उभारणी करण्यात आली आहे. या मार्टमध्ये 1 हजारांवर वस्तू कमाल किंमतीपेक्षा स्वस्त देण्यात येणार आहेत. लवकरच तिसर्‍या  मोठ्या स्क्रीनचाही शुभारंभ करण्यात येणार आहे.

धाराशीव साखर कारखाना डी.व्ही.पी. ग्रूपने विकत घेतला असून तो चांगल्या पद्धतीने चालू आहे. अन्य नवीन उद्योग क्षेत्रातही प्रवेश करून युवकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचे उद्दीष्ट आहे. जगाच्या तुलनेत भारतात स्कील्ड मनुष्यबळ कमी असून या मनुष्यबळाला प्रशिक्षित करून त्याला योग्य ते काम मिळवून देण्याचे ध्येय असल्याचे ही पाटील यांनी सांगितले. शहिदांना श्रध्दांजली वाहून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.  यावेळी माजी जिल्हाधिकारी गोकूळ मवारे,  मनसेचे जिल्हासंघटक दिलीप धोत्रे,  श्रीमती जयश्री धनंजय पाटील, सौ. सुमित्रा अभिजित पाटील, सौ. रेश्मा अमर पाटील, राहूल शहा, श्रीकांत बोरगावकर, अमर पाटील, श्रीनिवास बोरगावकर, अप्पा राऊत आदी उपस्थित होते. 

 

Tags : Dream Of Employment,  Employment, Abhijit Patil , Solapur