Fri, Jul 19, 2019 14:14होमपेज › Solapur › विद्युत टॉवरखाली जमिनी असलेल्यांना दुप्पट मोबदला

विद्युत टॉवरखाली जमिनी असलेल्यांना दुप्पट मोबदला

Published On: Mar 25 2018 11:08AM | Last Updated: Mar 25 2018 11:07AMमंगळवेढा(सोलापूर) : तालुका प्रतिनिधी 

विद्युत टॉवरखाली जमिनी असलेल्या शेतकर्‍यांना दुप्पट मोबदला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे मंगळवेढा तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. 

मंगळवेढा तालुक्यात अनेक विद्युत टॉवर आहेत. तर यामुळे जवळपास ५०० शेतकरी बाधीत होतात. या शेतकर्‍यांना योग्य मोबदला दिला जात नव्हता. याकरिता कृती समितीचे आंदोलन उभारले होते. याकरिता मंत्रालयात वर्षभरात ४० बैठका घेण्यात आल्या. या आंदोलनाची दखल घेत उर्जा विभागाने ६६ के.व्ही.ते १२०० के.व्ही.पर्यंत उच्चदाब असलेल्या विद्युत टॉवरखाली ज्या शेतकर्‍यांची शेती आली आहे, त्यांना दुप्पट मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच तारेखाली जी जमिन आली असेल त्यांना १५ टक्के मोबदला दिल्या जाणार आहे. ज्या शेतकर्‍यांच्या सातबारावर टॉवरची नोंद येत नव्हती, त्यांच्या सातबारावर तशी नोंद केली जाणार आहे. या निर्णयामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. विद्युत टॉवरखाली आलेल्या नुकसानाच्या जमिनीचे क्षेत्र ८ गुंठे धरावी आणि रेडीरेकरचा दर चारपट करून मोबदला द्यावा, यासह अन्य मागणी आहेत 

Tags : solapur, solapur news, landowners, electric towers, farmer