होमपेज › Solapur › डॉक्टर मुलाचे अपहरण करुन ठार मारण्याची धमकी; चौघांवर गुन्हा दाखल

डॉक्टर मुलाचे अपहरण करुन ठार मारण्याची धमकी; चौघांवर गुन्हा दाखल

Published On: May 05 2018 11:23PM | Last Updated: May 05 2018 10:44PMसोलापूर : प्रतिनिधी

डॉक्टर मुलाचे अपहरण करुन त्यास जीवे मारण्याची धमकी देणार्‍या चौघांविरुध्द विजापूर नाका पोलिस  ठाण्यात  गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. सिकंदर  शेख  उर्फ अ. हमीद लाल  अहमद  शेख (रा. सिध्देश्‍वर पेठ, सोलापूर, सध्या सिव्हिललाईन, सात रस्ता, सोलापूर), पठाण, शेख, दीपक बनसोडे (रा. सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवपुत्र इरण्णा लच्याण (वय 63, रा. स्नेहल पार्क, जुळे सोलापूर, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

शिवपुत्र लच्याण यांचा मुलगा डॉ. अमोल याने अक्‍कलकोट तालुक्यातील तडवळ येथे नवीन दवाखाना टाकण्यासाठी जनता सहकारी बँक, शाखा पुणे येथे कर्ज प्रकरण केले आहे. हे कर्ज प्रकरण मंजूर झाले असून सिकंदर शेख याने  मी या बँकेचा एजंट आहे व हे कर्ज प्रकरण माझ्यामुळेच मंजूर झालेे, असे सांगितले. त्यामुळे कर्ज प्रकरण मंजूर झाल्यामुळे या प्रकरणाचे 10 टक्क्याप्रमाणे 10 लाख रुपये होतात. तरी ते पैसा का देत नाही असे म्हणून सिकंदर शेख व इतरांनी लच्याण यांच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. यावेळी लच्याण यांची पत्नी सोडविण्यासाठी आली असता तिलाही शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली व डॉ. अमोल याचे अपहरण करुन त्यास खल्लास करतो, तुम्हालापण खलास करतो अशी धमकी दिली म्हणून विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार भालशंकर तपास करीत आहेत.