Tue, Jul 16, 2019 13:50होमपेज › Solapur › सभासदांच्या विश्‍वासाला पात्र राहून काम करा

सभासदांच्या विश्‍वासाला पात्र राहून काम करा

Published On: Jan 22 2018 1:22AM | Last Updated: Jan 21 2018 10:59PMसोलापूर : प्रतिनिधी   

पतसंस्था आणि बँकांच्या संचालक मंडळाने सभासद आणि ठेवीदारांच्या विश्‍वासाला पात्र राहून पारदर्शकपणे संस्थांचा कारभार करावा, असे आवाहन राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. रविवारी सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने संस्था अध्यक्ष तथा संचालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

सर्वसामान्य ठेवीदारांनी कष्टाने जमवलेली पुंजी संचालक मंडळाच्या विश्‍वासावर पतसंस्थेत ठेवलेली असते. त्यामुळे आयुष्यभराची जमलेली पुंजी जपणे, वाढविणे हे संचालक मंडळाचे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य त्यांनी सक्षमपणे पार पाडावे, असे आवाहनही त्यांनी केले.पतसंस्थांचा कारभार काटकसरीने आणि नेटाने केल्यास सभासदांना खर्‍याअर्थाने आर्थिक मदत करता येईल, असा विश्‍वास सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्‍त केला. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटमध्ये घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत जिल्ह्यातील अनेक पतसंस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दक्षिण सोलापूरचे सहायक निबंधक वाघमारे, उत्तरचे अरुण सातपुते, जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पंतगे, राज्य बँकेचे सदस्य अविनाश महागावकर उपस्थित होते. यावेळी पतसंस्थांची व्यवसाय वृध्दी, प्रभावी व्यवस्थापन आणि सर्व सभासदांचा विकास या विषयांवर अनेक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी अ‍ॅड. सोमनाथ नवले, नितीन वाणी, नागेश कोकरे यांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आले होते.