Sun, Aug 18, 2019 14:43होमपेज › Solapur › घटस्फोटितेवर बलात्कार; एकास पोलिस कोठडी

घटस्फोटितेवर बलात्कार; एकास पोलिस कोठडी

Published On: May 26 2018 12:20AM | Last Updated: May 25 2018 11:29PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

घटस्फोटित महिलेस लग्‍नाचे आमिष दाखवून सलग वर्षभर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.  याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. विजय मोहन थोरात (रा.तांदुळवाडी, ता. बार्शी) असे लग्‍नाचे आमिष दाखवून वर्षभर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. थोरात यास  अटक करून शुक्रवारी  बार्शी न्यायालयात उभे केले असता, त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. याबाबत संबंधित 30 वर्षीय घटस्फोटित महिलेने पांगरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पीडिता ही उपळे दुमाला येथील रहिवासी  आहे. मात्र ती तांदुळवाडी येथील आपल्या मामीकडे राहण्यास होती. यापूर्वी 2004 मध्ये तिचा विवाह झाला होता.

मात्र पती-पत्नीमधील वैवाहिक संबंध हे ताणतणावाचे असल्यामुळे कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी दावा करण्यात आला होता. पीडिता पुणे येथे राहण्यास असताना विजय थोरात हा तिच्या संपर्कात होता. दोघांमधील बोलणे वाढत गेल्यानंतर दोघे थोरात याच्या तांदुळवाडी येथील घरी आल्यानंतर तेथे पीडितेस तू घाबरू नकोस, मी तुझ्याशी लग्न करतो, असे म्हणून अत्याचार केला. तांदुळवाडी, पुणे तसेच कल्याण येथे वारंवार लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. औरंगाबाद येथील लग्नासाठी गेल्यानंतर तेथील रजिस्टर मॅरेज  ऑफिसमध्ये गेल्यानंतर फिर्यादीस काहीही न सांगता थोरात हा तेथून निघून गावाकडे  आला. त्यामुळे लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर वर्षभर अत्याचार केल्याची पीडितेची खात्री झाली. पीडितेने पांगरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून विजय थोरात याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यातआली आहे. थोरात यास 29 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिक तपास सपोनि धनंजय ढोणे करत आहेत.