Sat, Jun 06, 2020 07:55होमपेज › Solapur › मुख्यमंत्र्यांशी चर्चा म्हणजे गाळेधारकांना तात्पुरता दिलासा : सुभाष देशमुख 

मुख्यमंत्र्यांशी चर्चा म्हणजे गाळेधारकांना तात्पुरता दिलासा : सुभाष देशमुख 

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 14 2018 11:52PMसोलापूर : प्रतिनिधी

गाळेधारकांच्या प्रश्‍नांसंदर्भात व्यापार्‍यांची आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा घडवून आणणे म्हणजे व्यापार्‍यांना तात्पुरता दिलासा दिला आहे. त्याचा  अर्थ मी व्यापार्‍यांच्या बाजून आहे असा मुळीच नाही, तर महापालिकेचे उत्पन्न वाढावे हीच माझी भूमिका आहे. मात्र कायदा आणि व्यवहाराची सांगड घालण्याचा मी प्रयत्न केला आहे, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

मंत्रीपदाचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्ताने श्रमिक पत्रकार संघात त्यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत  महापौर शोभा बनशेट्टी, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार उपस्थित होते.

देशमुख म्हणाले की, महापालिकेचे उत्पन्न वाढावे यासाठी माझा नेहमीच प्रयत्न आहे. त्याला माझा कधीच विरोध नाही. मात्र लिलाव प्रक्रियेतून किंवा ई-टेेंडर प्रक्रियेतून वर्षानुवर्षे व्यापार करणार्‍यांना मुद्दाम त्रास देण्यासाठी चढी बोली लावली जाईल व भरमसाठ भाव होईल, त्याचा नाहक त्रास व्यापार्‍यांना होईल. त्यामुळे याचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. महापालिकेचे उत्पन्न वाढले तर पाहिजेच; मात्र व्यापार्‍यांनाही जाणून बुजून त्रास नको यासाठी त्यांची मुख्यमंत्र्यांची चर्चा घडवून आणली.  काही दिवसांमध्ये राज्याचे धोरण ठरल्यावर महापालिकेचे उत्पन्न वाढेल आणि व्यापारी ते आनंदाने स्वीकारतील, अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे मी अमुकाच्या  बाजूने नसून केवळ कायद्याच्याच बाजूने असल्याचा खुलासाही त्यांनी केला.

शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिला

शहरातील विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिला आहे. ‘अमृत’ योजनेंतर्गत ड्रेनेजलाईनसाठी 158 कोटी, मुख्यमंत्री विशेष अनुदानातून 25 कोटी, नागरी सोयीसुविधांसाठी विकासासाठी 13 कोटी 92 लाख, महानगपालिका क्षेत्रातील सोयीसुविधांसाठी 10 कोटी, संभाजी तलाव सुशोभिकरणासाठी 5 कोटी, जुळे सोलापुरात जलतरण तलाव  याशिवाय गुंठेवारी नियमित करणे आणि केटरिंग कॉलेज सुरु केले असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.