Wed, Mar 20, 2019 02:53होमपेज › Solapur › राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदासाठी दीपक आबांची शिफारस 

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदासाठी दीपक आबांची शिफारस 

Published On: Apr 24 2018 1:08AM | Last Updated: Apr 23 2018 1:20AMसोलापूर  :  प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी संदीप वर्पे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रवादी पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदासाठी दीपक साळुंखे-पाटील यांची एकमताने शिफारस करण्यात आली. त्यामुळे लवकरच साळुंखे-पाटील यांच्या नावाची घोषणा प्रदेश कार्यालयातून होणार असल्याची माहिती संदीप वर्पे यांनी दिली आहे.  

राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या बैठकीस जिल्ह्याचे नेते खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ. दिलीप सोपल, आ. बबनदादा शिंदे, माजी आ. राजन पाटील, कार्याध्यक्ष बळीराम काका साठे, रश्मी बागल आदी उपस्थित होते. साळुंखे-पाटील यांच्या नावाला राजूबापू पाटील, उमेश पाटील, अजिंक्यराणा पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंदाताई काळे यांनी अनुमोदन दिले. निवडणूक अधिकार्‍यांनी दिलेल्या वेळेत दीपक साळुंखे-पाटील यांचा अर्ज सोडला तर दुसरा कोणाचाच अर्ज आला नाही.त्यामुळे दीपक साळुंखे-पाटील यांचा अर्ज प्रदेश कार्यकारिणीकडे पाठवून देण्यात येणार असून यावर दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे, जिल्ह्याचे प्रभारी अजित पवार यांच्यात चर्चा झाल्यानंतर निवडीची अधिकृत घोषणा होणार असल्याचे वर्पे यांनी सांगितले.

या बैठकीस बाबासाहेब पवार, मारुती जाधव, राजेंद्र हजारे, दिगंबर सुडके, शिवराज जाधव, मिलिंद गोरे, युवराज पाटील, संकेत ढवळे, आप्पासाहेब जाधव, आप्पाराव कोरे, कल्पनाताई हिंगमिरे, गोकर्णा डिसले आदी उपस्थित होते.