Wed, Jan 23, 2019 04:25होमपेज › Solapur › विरोधकांनी आधी स्वतःच्या संस्था व्यवस्थित चालवाव्यात : आ. सोपल

विरोधकांनी आधी स्वतःच्या संस्था व्यवस्थित चालवाव्यात : आ. सोपल

Published On: Jun 06 2018 10:27PM | Last Updated: Jun 06 2018 10:12PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

बार्शी कृषी बाजार समितीच्या माध्यमामधून आपण शेतकरी हिताबरोबरच, व्यापारी व हमाल- तोलार अशा सर्व घटकांच्या तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फायद्याच्याच गोष्टी करून बाजार समितीला शासकीय फायदे व अनुदान मिळवून दिले. विरोधकांनी अगोदर आपल्या संस्था व्यवस्थित चालवाव्यात, असे प्रतिपादन आ. दिलीप सोपल यांनी केले.

ते बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या निवासस्थानी तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. 
यावेळी व्यासपीठावर औद्योगिक वसाहतीचे चेअरमन सुधीर सोपल, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, आर्यन सोपल, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार काशीद, शहराध्यक्ष अरूण माने, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा मंदाताई काळे, पंचायत समिती सभापती कविता वाघमारे, बप्पा काशीद, युवराज काटे, मकरंद निंबाळकर, निरंजन भूमकर, बार्शी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, काँग्रेसचे  रमजान पठाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब कोरके, गणेश जाधव, कमलाकर पाटील, अरूण नारकर, मंगलताई शेळवणे, शेख उपस्थित होते.

आ. सोपल पुढे बोलताना म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोन कोटी रूपयांचे गोदाम 20 लाख रूपयांत बाजार समितीला मिळवून दिले. बाजार समितीत पैसा खाल्ला या विरोधकांच्या आरोपाचाही आ. सोपल यांनी खरपूस समाचार घेऊन कर्मचार्‍यांच्या पगारी बँकेतून झाल्याचे सांगितले. निवडणुकीसाठी व्यापारी तसेच तालुक्यातील जनतेमधून मोठा प्रतिपादन मिळत असल्याचे सांगून इच्छुक उमेदवारांनीच आपला उमेदवार निश्‍चित करून सांगितल्यास त्या उमेदवारासच संधी देण्यात येईल, असेही ते म्हणाले. 

बार्शी बाजार समितीमधील कथित अपहाराचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, न्यायालयातून त्याचे वास्तव बाहेर येईल. न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य राहणार आहे.
तालुकाध्यक्ष काशिद यांनी आपल्या प्रास्ताविकात रूसवे फुगवे गट तट सोडून आ. सोपलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन केले. यावेळी नागेश  अक्कलकोटे, आर्यन सोपल, अनिल काटमोरे, रमजान पठाण, अब्बास शेख, नवनाथ चांदणे, बाळासाहेब कोरके, अरूण नारकर यांची भाषणे झाली. बैठकीला राष्ट्रवादीचे आजी- माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.