Fri, Feb 22, 2019 10:25होमपेज › Solapur › सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी दिलीप माने 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी दिलीप माने 

Published On: Jul 16 2018 11:57AM | Last Updated: Jul 16 2018 11:57AMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी काँग्रेसचे माजी आमदार दिलीपराव माने यांची तर उपसभापती पदी श्रीशैल नरोळे यांची सोमवारी सकाळी निवड झाली. यावेळी बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, प्रकाश वानकर, राजकुमार वाघमारे, इंदुमती अलगोंडा पाटील, बाळासाहेब शेळके, प्रकाश चोरेकर, नामदेव गवळी, विजया भोसले, अमर पाटील, वसंत पाटील, अप्पासाहेब पाटील, रामप्पा चिवडशेट्टी, बसवराज इटकले, केदार उंबरजे, शिवानंद पुजारी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री गैरहजर
सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना राजकीय शह देत पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांनी बाजार समितीत संचालक म्हणून निवडून आले. मात्र, सभापती निवडी वेळी ते गैरहजर होते. या निवडीनंतर माने समर्थकांनी बाजार समितीत जोरदार जल्लोष केला.