होमपेज › Solapur › मोहोळ तहसीलसमोर धनगर समाजाचे धरणे 

मोहोळ तहसीलसमोर धनगर समाजाचे धरणे 

Published On: Aug 05 2018 1:34AM | Last Updated: Aug 04 2018 10:35PMमोहोळ : वार्ताहर

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करा या मागणीसाठी मोहोळ तालुक्यातील धनगर समाजबांधवांनी तहसीलसमोर शनिवार, 4 ऑगस्ट रोजी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. 
2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात 43058 व सोलापूर जिल्ह्यात 1659 एवढी धनगर जमात राहत असल्याची माहिती शासनाच्या दप्तरी आहे. यासंदर्भात जातपडताळणी समिती व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या माहिती घेतली. त्यावेळी धनगढ जमातीचा एकही व्यक्ती अस्तित्वात नसल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. मात्र भाजप-शिवसेनेचे सरकार जाणूनबुजून धनगर आरक्षणाला विलंब करीत आहे. त्यामुळे धनगरबांधवांमध्ये नाराजीचा सुरु आहे. 

सरकारने  सन 2011 च्या जनगणनेमध्ये जे धनगर दाखविले आहेत त्यांच्या राहण्याचे दाखले, कुटुंबपत्रक मिळावे, अशी मागणी धनगर समाजबांधवांनी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोहोळ शहर व तालुक्यातील धनगरबांधवांनी 4 ऑगस्ट रोजी एक दिवसाचे धरणे आंदोलन करुन सरकारचा निषेध केला. 

यावेळी पं.सं. सभापती समता गावडे, यशवंत नरुटे, रामचंद्र खांडेकर, नागनाथ क्षीरसागर, कृष्णदेव वाघमोडे, संजय अण्णा क्षीरसागर, सुनील  पाटील, सज्जन पाटील, मालती टेळे, धनाजी गावडे, अशोक बरकडे, अनंता नागणकेरी, अतुल गावडे, सुशील क्षीरसागर आदींसह बहुसंख्य धनगर समाजबांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील शिंदे यांनी केले.

धनगर समाजाच्या मागणीस वाढता पाठिंबा            
धनगर समाजाच्या या आंदोलनास राष्ट्रवादीचे माजी आ. राजन पाटील, रिपब्लिकन पिपल्स फ्रंटचे महाराष्ट्र अध्यक्ष धनंजय आवारे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, उपाध्यक्ष हेमंत गरड, शिवसेना तालुकाप्रमुख काका देशमुख, जिल्हा उपप्रमुख दादासाहेब पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश काळे, एमआयएमचे बिलाल शेख, माजी सरपंच बिलालभाई शेख, दलित स्वंयसेवक संघाचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद अष्टुळ, राज्य संघटक फकिरा जाधव, भारतीय दलित महासंघाचे संस्थापक संजीव खिलारे, भीम युवा प्रतिष्ठानचे संस्थापक विनोद कांबळे, मनसेचे शाहूराजे देशमुख, रिपब्लिकन पार्टी युवकचे प. महाराष्ट्र उपाध्यक्ष हणमंत कसबे इत्यादींनी या आंदोलनास भेट देऊन पाठिंबा दिला.