Sun, Jul 21, 2019 00:16होमपेज › Solapur › धनगर समाजाचे सोलापुरात धरणे आंदोलन (Video)

धनगर समाजाचे सोलापुरात धरणे आंदोलन (Video)

Published On: Aug 24 2018 2:43PM | Last Updated: Aug 24 2018 2:43PMसोलापूर : प्रतिनिधी 

धनगर समाजाला ऱाज्यघटनेन आरक्षण दिले आहे. मात्र धनगर या शब्दाच्या स्प्लेलिंग मध्ये धनगड असं लिहिलं गेल्यामुळं समाज आरक्षणापासून वंचित राहिला. सत्तेत आल्यानंतर तीन महिन्यात हा अन्याय दूर करु असं म्हणणाऱ्या फडणवीस सरकारला चार वर्षे झाल्यावरही आरक्षण दिलं नाही त्यामुळे आता मोर्चाची धार वाढवू असं प्रतिपादन धनगर समाजाचे नेते चेतन नरोटे यांनी केलं.

धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आज सोलापूरात आज धरणे आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. या मोर्चाला भाजप वगळता सर्व पक्षाने पाठिंबा देत मोर्चात सहभाग नोंदविला.

दुपारी बाराच्या सुमारास चार हुतात्मा पुतळा येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यावर धनगर समाजाच्या हजारो बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आंबेडकर चौक,  सिध्देश्वर मंदिर या मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तेथे मोर्चाचे रुपांतर धरणे आंदोलनात झाले. 

यावेळी कॉंग्रेस माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादी युवकअध्यक्ष संतोष पवार, शिवसेनेचे शहाराध्यक्ष प्रताप चव्हाण,माजी महापौर अरुणा वाकसे यांच्यासह हजरो धनगर समाज बांधव उपस्थित होते.