Fri, Jul 19, 2019 01:24होमपेज › Solapur › लाखोंच्या संख्येने निवेदने देण्याचा निर्धार

लाखोंच्या संख्येने निवेदने देण्याचा निर्धार

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 8:23PMसोलापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य सरकारने नेमलेल्या मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व आरक्षणासंदर्भात राज्यस्तरीय समिती 4 मे रोजी सोलापुरात येणार आहे. त्या समितीला सोलापूर शहरासह जिल्ह्यातील मराठाबांधव लाखोंच्या संख्येने निवेदने देणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आली.सकल मराठा समाजाच्यावतीने सोलापूर जिल्ह्यातील व शहरातील सकल मराठा समाजाच्या पदाधिकार्‍यांची बैठक सोमवारी दुपारी सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात  झाली. 4 मे रोजी मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी येणार्‍या राज्य मागासवर्गीय आयोगास  बचत गट, सहकारी संस्था, खासगी संस्था व वैयक्तिक पातळीवर निवदने देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात महिला पदाधिकार्‍यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदनाने बैठक सुरू करण्यात आली.

कोपर्डीच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्यातील मराठा समाज एकवटला. मराठा समजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षण मिळाले पाहिजे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरीत आरक्षण, शैक्षणिक आरक्षण आदींसंदर्भात राज्यस्तरीय समिती नेमली आहे. या समितीने मराठवाड्यापासून सर्वेक्षणास सुरुवात  केली आहे.वेगवेगळ्या जिल्ह्यांचा अभ्यास करत 4 मे रोजी ही समिती सोलापुरात येणार असून त्यासंदर्भात सोमवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे सर्व पदाधिकारी व तालुका पातळीवरील सर्व पदाधिकारी व मराठाबांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते. शहरातील व जिल्ह्यातील मराठाबांधवांनी लाखोंच्या संख्येने वैयक्तिक निवेदने द्यावीत. खासगी संस्था, सहकारी संस्था, बचत गटांनी सर्वेक्षणसाठी आलेल्या समितीला निवेदने द्यावीत, असे  या बैठकीत ठरविण्यात आले आहे. तालुका पातळीवर काम करणार्‍या  सकल मराठा समाजाच्या पदाधिकार्‍यांनी आपल्या तालुक्यात कशाप्रकारे निवेदन देणार  याची माहिती दिली व मार्गदर्शन केले.

या बैठकीत पुरुषोत्तम बरडे, माऊली पवार, संतोष पवार, शाम कदम, श्रीकांत डांगे, राजन जाधव, संजय शिंदे, शहाजी पवार, प्रकाश वानकर, अमोल शिंदे, प्रवीण डोंगरे, दीपक गायकवाड, प्रा. जी.के. देशमुख, श्रीकांत घाडगे, हेमंत पिंगळे, राजाभाऊ सुपाते, सोमनाथ राऊत, नंदा शिंदे, अ‍ॅड. नीला मोरे, मनिषा नलावडे, गणेश वानकर, शिवाजी  नीळ, लहू  गायकवाड, अजिंक्यराणा पाटील, शंतनू साळुंखे आदी पदाधिकारी व मराठाबांधव उपस्थित होते.

Tags : Solapur, Determination, number, millions, nominees