Sat, Apr 20, 2019 07:52होमपेज › Solapur › मराठा आंदोलनाच्या धास्तीने मंगळवेढा आगार बंद

मराठा आंदोलनाच्या धास्तीने मंगळवेढा आगार बंद

Published On: Jul 22 2018 10:59AM | Last Updated: Jul 22 2018 10:59AMमंगळवेढा  : प्रतिनिधी

मंगळवेढा येथे मराठा आरक्षण मागणीला हिंसक वळण आल्याने मंगळवेढा आगाराच्या तीन बस चे नुकसान झाल्याने आगार व्यवस्थापक  मधुरा जाधवर यानी पुढील निर्णय होई पर्यन्त आगारातील सर्व बस फेऱ्या रद्द केल्याची माहिती दिली. 

प्रवाशांची होतेय कोंडी

अचानक अशा प्रकारे आगारातून बाहेर जाणाऱ्या प्रवासी बस रद्द झाल्याने आज प्रवाशांची गैरसोय होत आहे. उद्या आषाढ़ीवारी असल्याने मंगळवेढ्यातील बाहेर गावी असणारे प्रवासी गावाकडे कसे यायचे आणि पंढरपूर येथे जाण्यासाठी आलेल्या लोकांच्‍यावर प्रवास कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. खासगी वाहनाचा तुटवड़ा असून जे वडाप जात आहेत त्यांनी दर वाढ़वले आहेत. त्‍यामुळे प्रवाशांची कोंडी होत आहे. 

आगारात  मंगळवेढा आगाराच्या सर्व गाड्या लावण्यात आल्या आहेत.  प्रवासात प्रवाशांना दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे गृहीत धरुन धोका पतकरायचा नाही म्हणून बस थांबविण्‍यात आल्या आहेत. 

शहरात शनिवार पासून  मराठा बेमुदत आंदोलनास सुरुवात झाली आहे.  यास मोठा पाठिंबा मिळत आहे. आ. भारत भालके यांनी काल दुपारी भेट देत मागन्‍यांच्‍याबाबत  सरकारने लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.