Fri, May 24, 2019 20:30होमपेज › Solapur › पीएफ कार्यालयात भ्रष्टाचार; चौकशी करण्याची मागणी

पीएफ कार्यालयात भ्रष्टाचार; चौकशी करण्याची मागणी

Published On: Jan 15 2018 1:45AM | Last Updated: Jan 14 2018 11:10PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी काही खासगी दलालांना हाताशी धरून शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र कामगार सेनेच्यावतीने मुंबई येथील अतिरिक्‍त  आयुक्‍त भविष्य निर्वाह निधी कार्यालयात निवेदनाद्वारे केली.

सुमारे दोन-तीन वर्षांपासून महिला विडी कामगारांच्या अशिक्षितपणाचा लाभ घेऊन त्यांना पेन्शन मिळवून देतो म्हणून खोटे जन्म दाखल्याचे पुरावे दाखल करून पेन्शनला पात्र नसलेल्या मागील फरकासह पेन्शनचा लाभ घेतला. सदर पेन्शनची रक्‍कम प्रत्यक्षात महिला विडी कामगारांना न देता भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व दलाल यांच्या संगनमताने भ्रष्टाचार केला.

दोन-तीन वर्ष झाले तरीही चौकशीतील दोषींवर कोणती कारवाई केली, याची माहिती द्यावी, अशी मागणी सोलापुरातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयात केली असता तेथून काही माहिती देण्यात आली नाही. यावरून सदर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून होत असेल असे दिसून येते. म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेच्यावतीने मुंबई येथील अतिरिक्‍त आयुक्‍त भविष्य निर्वाह निधी येथील अतिरिक्‍त  आयुक्‍त  सिंग यांना भेटून वरील निवेदन देण्यात आले.