Sun, Jun 16, 2019 12:10
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › प्लास्टिकबंदीमुळे कापडी पिशव्यांना मागणी

प्लास्टिकबंदीमुळे कापडी पिशव्यांना मागणी

Published On: May 07 2018 2:05AM | Last Updated: May 06 2018 10:41PMपंढरपूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने प्लास्टिकमुक्तीसाठी प्लास्टिक पिशव्यांना बंदी घातल्याने सर्व स्तरातून कापडी पिशव्यांची मागणी वाढली आहे. या संधीचा लाभ घेत येथील पालवी संस्थेतील आधार गटाच्या महिला व युवतींनी जुन्या साड्यांपासून पर्यावरण पूरक अशा कापडी पिशव्यांची निर्मिती सुरू केली आहे. या आधार गटाला नाशिक येथील एका उद्योजिकेकडून तब्बल 3 हजार पाचशे पिशव्यांची ऑर्डर मिळाली आहे. प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाची र्‍हास होत असल्याने शासनाने राज्यभरात प्लास्टिक बंदी आणली. या निर्णयाचे सर्वसामान्यांनी स्वागत केले आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करता कापडी पिशव्या वापरण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. असे असले तरी अद्यापही बाजारामध्ये स्वस्त दरातील कापडी पिशव्यांचा तुटवडा जाणवत आहे.

बाजारपेठेची नेमकी ही गरज ओळखून येथील पालवी संस्थेतील आधार गटाने जुन्या साड्यांपासुन कापडी पिशव्या बनविण्याचा उद्योग सुरू केला आहे. पर्यावरण पूरक अशा या कापडी पिशव्यांना येथील व्यापारी तसेच महिलावर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिक येथील एका उद्योजिकेने या पिशव्यांचा चांगला दर्जा व रास्त दर पाहून तब्बल साडेतीन हजार पिशव्यांची ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर पूर्ण करण्याची लगबग सध्या आधार गटाच्या महिलांकडून सुरू आहे. सेल्फ रिलायंस प्रोजेक्ट अंतर्गत महिलांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी आधार गटाची स्थापना करण्यात आली आहे.या आधार गटाने तयार केलेल्या कापडी पिशव्या व बटव्यांना सर्व स्तरांतून मोठी मागणी आहे.

Tags : Solapur, Demand, cloth, bags, due, plastic, ban