Tue, Nov 20, 2018 03:40होमपेज › Solapur › गादेगाव -पंढरपूर रस्ता दुरुस्तीची मागणी

गादेगाव -पंढरपूर रस्ता दुरुस्तीची मागणी

Published On: Jan 07 2018 2:04AM | Last Updated: Jan 06 2018 11:18PM

बुकमार्क करा
पंढरपूर : प्रतिनिधी

गादेगाव (ता. पंढरपूर) येथील गादेगाव ते पंढरपूर रस्ता अनेक दिवसांपासून अत्यंत खराब झाला आहे. तातडीने हा रस्ता दुरुस्त करावा, अशी  मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.
गादेगावपासून ते फुट रस्तापर्यंत हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहन चालविताना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. या रस्त्यावरून एसटीची वाहतुक चालू आहे. परंतू एसटीची अवस्थाही बिकटच झाली आहे.

या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आसपासच्या गावातील रूग्णांना या आरोग्य केंद्रात रात्री अपरात्री यावे लागते. कधी कधी डिलीव्हरीसाठी पंढरपूर येथे जावे लागते. प्राथमिक शाळा, हायस्कूल, कॉलेज, बँक, विज-महावितरणाचे कार्यालय आहे. त्यामुळे लोकांची, विद्यार्थ्यांची वर्दळ असते. तसेच या रस्त्यावरून ऊस वाहतूक होते. या मार्गावर 5 खडी क्रेशर असल्यामुळे   त्याची वाहतूक होते. त्यामुळे हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. तो दुरूस्तीची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. परंतू सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. तातडीने हा रस्ता त्वरीत दुरुस्त करावा अन्यथा तीवृ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात येत आहे.