होमपेज › Solapur › करमाळा पं. स. कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

करमाळा पं. स. कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Published On: Jan 05 2018 1:29AM | Last Updated: Jan 04 2018 9:36PM

बुकमार्क करा
करमाळा : तालुका प्रतिनिधी

जि.प. सोलापूर (करमाळा पंचायत समिती) समाजकल्याण विभागाचे कर्मचारी पी. पी. मोरे यांनी जि.प. माध्यमातून शेतकर्‍यांना अनुदानित इलेक्ट्रीक मोटारी परस्पर विक्री करून शासनास लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात गटविकासाधिकारी ढवळे-पाटील  यांना निवेदन देण्यात आले आहे. 

निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महा.राज्य, सामाजिक न्याय मंत्री, ग्रामविकास मंत्री, राज्यमंत्री ग्रामविकास महा.राज्य, विभागीय आयुक्‍त पुणे विभाग, जिल्हाधिकारी सोलापूर, अध्यक्ष जि.प. सोलापूर, मुख्य कार्य.अधिकारी, जि.प.सोलापूर,  सभापती पं.स. करमाळा यांना पाठविण्यात आल्या आहेत. निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके, जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, सचिव सुहास टोणपे, अजित तळेकर (सरपंच, केम), अतुल वारे (ता.अध्यक्ष मसेसं), संदीप रोडगे (जि.उपाध्यक्ष), गणेश कुकडे (जि.संघटक), अमित घोगरे (ता.अध्यक्ष संभाजी ब्रिगेड), सतीश चोपडे, महेश शितोळे, हनुमंत पवार आदी उपस्थित होते.