होमपेज › Solapur › घाटणे बॅरेज बंधारा चार मीटरने अडवा

घाटणे बॅरेज बंधारा चार मीटरने अडवा

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 10:57PM

बुकमार्क करा
मोहोळ : प्रतिनिधी

सोलापूरसाठी उजनी धरणातून अकरा जानेवारीपासून नदी आणि कालव्यात पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबईत झालेल्या कालवा सल्लागार समिती बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूरवरील संभाव्य पाणीसंकट तूर्त टळले आहे. त्याचबरोबर मोहोळ शहराला व तालुक्याच्या दक्षिण भागाला वरदान ठरणार्‍या सीना नदीवरील घाटणे बॅरेज बंधार्‍यामध्ये देखील चार मीटर पाणी अडवण्याबाबतचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्याची माहिती भाजपचे तालुका अध्यक्ष सतीश अप्पा काळे यांनी पत्रकारांना भ्रमणध्वनीवरून बोलताना दिली .
मोहोळ तालुक्यातील घाटणे बॅरेज बंधार्‍यात पाणी आडवावे, असे निवेदन भाजपचे तालुका अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अभ्यासू संचालक सतीश अप्पा काळे यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना दिले होते. त्यावेळी महाजन यांनी संबंधीत खात्याच्या अधिकार्‍यांना पाणी तातडीने कालवा समितीत विषय घ्यावा व अहवाल सादर करावा, असा आदेश यापूर्वीच दिला होताा. काल झालेल्या बैठकीत पाणी अडवण्याबाबतचे आदेश दिल्याने 13 गावांचा पाणीप्रश्‍न मार्गी लागत असून साधारण तीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. असेही यावेळी सतीश अप्पा काळे यांनी सांगितले. 

 मराठवाड्याला पाणी नेण्यासाठी मोहोळ तालुक्यातीत सीना नदीवर घाटणे येथे गोदावरी खोरे विकास महामंडळ यांच्याकडून बॅरेज बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधार्‍याची 135 एमटीएफसी क्षमता आहे. या बंधार्‍यात पाणी साठवण केल्याने या परिसरातील तेरा गावांना याचा फायदा होणार असल्याने पाणी अडवण्याची मागणीचा पाठपुरावा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडून भाजपाचे मोहोळ तालुका अध्यक्ष सतीश अप्पा काळे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मौजे घाटणे बंधार्‍यात पाणी अडविण्याबाबत कालवा समितीच्या नियोजनात समाविष्ट करावा. यामुळे सुमारे चार मीटर उंचीने पाणी अडवले जाणार आहे. ते तातडीने अडवावे, अशा मागणीचा पाठपुरावा सातत्याने सुरू होता. त्यामुळे जलसंपदामंत्री  गिरीश महाजन यांनी याबाबत कायमस्वरूपी पाणी अडवून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते, यामुळे तेरा गावाला घाटणे, भोयरे, मलिक पेठ, एकुरके, बिटले, नरखेड, डिकसळ, वाळूज देगाव, मोहोळ, अष्टे, भांबेवाडी, हिंगणीसह अन्य गावातील पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मिटणार आहे. 

थकीत बिल भरल्यानंतर ‘सीना-माढा’मध्ये पाणी
उजनी धरणातील सन 2017-18 मधील रब्बी हंगामाची कालवा सल्लागार समितीची बैठक मंत्रालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये उजनी डावा व उजवा कॅनॉलला तसेच भीमा नदीला 11/1/2018 रोजी सकाळी 11 वाजता पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे थकित वीजबिल 50 लाख रुपये भरल्यानंतर सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात येईल. सदर बैठकीमध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, आ. बबनदादा शिंदे, आ. भारतनाना भालके, माजी आमदार दीपक साळुंखे, समाधान अवताडे, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, शिवाजी चौगुले अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता राजपूत यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.