Wed, May 22, 2019 16:16



होमपेज › Solapur › कारी शिवारात कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या 

कारी शिवारात कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या 

Published On: Apr 25 2018 11:55PM | Last Updated: Apr 25 2018 11:32PM



बार्शी ः तालुका प्रतिनिधी 

कर्जबाजारी शेतकर्‍याने शेतात स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, 25 बुधवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कारी (ता. बार्शी) शिवारात उघडकीस आली. सौदागर भानुदास डोईफोडे (वय 60, रा. कारी, ता. बार्शी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या कर्जबाजारी शेतकर्‍याचे नाव आहे. बालाजी हणुमंत क्षीरसागर (वय 26, रा. नारी, ता. बार्शी) यांनी याबाबत पांगरी पोलिसांत घटनेची खबर दिली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत डोईफोडे यांनी काल मंगळवार, 24 रोजी रात्री आपल्या कुटुंबियासमवेत जेवण केले. मृताचा मुलगा सकाळी 6 वाजता झोपेतून उठला  असता वडिलांचा शोध घेतल्यावर त्यांनी जवळच्याच लिंबाच्या झाडास पांढर्‍या रस्सीने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. 

क्षीरसागर यांनी पांगरी पोलिसांत दिलेल्या खबरीत म्हटले आहे की, मृत डोईफोडे यांनी त्यांच्यावर झालेल्या कर्जामुळे आत्महत्या केली. मृत डोईफोडे यांना तीन मुली व दोन मुले आहेत. सर्व मुलींचे विवाह झालेले आहेत. याबाबत पांगरी पोलिसांत अकस्मात मृत म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष बडे हे करत आहेत.