Wed, Jun 26, 2019 17:51होमपेज › Solapur › ‘पात्र असून अर्ज न केलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी’

‘पात्र असून अर्ज न केलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी’

Published On: Dec 26 2017 1:35AM | Last Updated: Dec 26 2017 1:35AM

बुकमार्क करा

 सोलापूर : प्रतिनिधी

राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतून आजपर्यंत 26 लाख 59 हजार शेतकर्‍यांच्या नावे जवळपास 10 हजार 667 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. ज्या लोकांनी पात्र असतानाही कर्जमाफीसाठी अर्ज केेलेला नाही अशा शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ होणार असल्याची माहिती राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.

सहकारमंत्री सुभाष देशमुख सोलापूर दौर्‍यावर आले असता त्यांनी संपर्क कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली होती. 

यामध्ये राज्यातील 46 लाख 33 हजार शेतकरी पात्र ठरले होते.त्यांच्यासाठी 22 हजार 300 कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली होती. आजपर्यंत यापैकी 26 लाख 59 हजार शेतकर्‍यांच्या नावे 10 हजार 667 कोटी रुपये जमा करण्यात आले असल्याचे सहकारमंत्री देशमुख यांनी सांगितले. ज्या शेतकर्‍यांचे कर्ज दीड लाख रुपयांपेक्षा अधिक आहे अशा शेतकर्‍यांनी उर्वरित रक्कम येत्या 31 मार्चपर्यंत बँकेत भरल्यास त्यांच्या खात्यावर दीड लाख रुपये जमा करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले. 

ऑनलाईन अर्ज मागविल्यामुळे कर्जमाफीसाठी विलंब झाला असला तरी कर्जमाफीत पारदर्शकता असून यामुळे पात्र शेतकर्‍यांनाच लाभ झाला असल्याचे देशमुख यांनी सांगितले.