Mon, Jul 22, 2019 00:34होमपेज › Solapur › रिक्षाच्या धडकेने टेक्स्टाईल कामगाराचा मृत्यू

रिक्षाच्या धडकेने टेक्स्टाईल कामगाराचा मृत्यू

Published On: Jun 09 2018 1:37AM | Last Updated: Jun 08 2018 11:40PMसोलापूर : प्रतिनिधी

टॉवेल कारखान्यात काम करत असताना चहाच्या निमित्ताने कारखान्याबाहेर आलेल्या एका कामगाराला ऑटो रिक्षाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. कृष्णाहारी सतय्या बोम्मा (वय 48, रा. 344 न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) असे मृताचे नाव आहे.

मंगळवारी अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील बी हॅण्ड टेलीटॉवेल या कारखान्यातील कामगार कृष्णाहारी बोम्मा आणि गणेश राजय्या यनगंदूल हे चहा पिण्यासाठी कारखान्याच्या जवळच असलेल्या सोलापूर जनता बँकेजवळील सुवर्णा  कँटिन येथे  चहा पिण्यासाठी निघाले होते. वाटेतच त्यांच्या पाठीमागून येणार्‍या एका ऑटो रिक्षाने त्यांना धडक दिली. त्यात त्यामध्ये कृष्णाहारी बोम्मा हे गंभीर जखमी झाले, तर गणेश यनगंदूल यांनाही डोक्याला मार लागला. दोघांनाही बेशुध्दावस्थेत शासकीय रग्णालयात   आणण्यात आले होते. यनगंदूल यांना लागलीच शुध्द आली. त्यांना दुसर्‍याच दिवशी घरी सोडण्यात आले. मात्र कृष्णाहारी बोम्मा यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली व दुपारी दोन वाजता त्यांचा मृत्यू झाला.

मारहाणीत दोघे गंभीर जखमी

जलेरोड पोलिस ठाण्याच्या जवळील रस्त्याने विनाकारण का ये-जा करतो या किरकोळ कारणावरून शहबाज मुतवहली याने दोघांनी काठी व दगडाने मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. साहील कबीर शेख (वय 18, रा. बेगम पेठ, सोलापूर), झाकीर इब्राहिम दुरुगकर ( वय 19, बेगम पेठ) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साहील आणि झाकीर हे दोघे गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास जेलरोड पोलिस ठाणे येथून मोटारसायकलवर डबलसीट निघाले होते. त्यावेळी त्यांना शहबाज मुतवल्ली यांनी अडविले व या रस्त्यावरून  दररोज सारखे का येत-जात असता असे विचारत लाकडाने आणि दगडाने मारहाण करण्यात सुरुवात केली. त्यामध्ये दोघेही जखमी झाले. त्यांना रात्री साडेबाराच्या सुमारास नोमान दुरुगकर यांनी उपासाठी दाखल केले.

पुंजाल मैदानाजवळ वृध्दाचा मृत्यू

 शासकीय तंत्रनिकेतनसमोरील पुंजाल मैदान येथे पायी जाणार्‍या सुरेश सिद्राम सरवदे (वय 65, रा. 101, साखर पेठ, सोलापूर) या वृध्दाचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितलेल्या वृत्तानुसार सुरेश सरवदे हे  आज (शुक्रवारी) सकाळी साडेआठच्या सुमारास पुंजाल मैदान शेजारी बेशुध्दावस्थेत पडले होते. त्यांना  पोलिस नाईक एस.व्ही. बहिर्जे यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

 रिक्षाच्या धडकेने महिला जखमी

 भाजी आणण्यासाठी बाहेर पडलेल्या महिला  राधाबाई श्रीनिवास फलवारी (वय 50, रा. घर नं. 205, मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर) यांना ऑटो रिक्षाने पाठीमागून धडक दिली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. ही घटना आज (गुरुवारी) सायंकाळी  सव्वासातच्या सुमारास घडली. राधाबाई यांची मुलगी आलिफा तुम्मा यांनी त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. 
‘खेडगीज’मध्ये नाव घातल्याने आत्महत्येचा प्रयत्न
 कल्याणशेट्टी कॉलेजमधून काढून सीबी खेडगीज अक्कलकोट येथील कॉलेजमध्ये पालकांनी नाव घातल्याने त्या रागात धरती मलप्पा बनसोडे (वय 16, रा. सदलापूर, ता. अक्कलकोट) हिने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

ही घटना आज (गुरुवारी) दुपारी साडेअकराच्या सुमारास घडली. तिला तिचे नातेवाईक अप्पाशा व्हदलुरे यांनी सायंकाळी साडेचारला शासकीय रुग्णालायात उपचारासाठी दाखल केले.