Mon, Apr 22, 2019 12:35होमपेज › Solapur › सोलापूर : पोलिस स्‍थानकात विष प्राशन केलेल्या युवकाचा मृत्यू

सोलापूर : पोलिस स्‍थानकात विष प्राशन केलेल्या युवकाचा मृत्यू

Published On: Aug 23 2018 10:50PM | Last Updated: Aug 23 2018 10:50PMटेभुर्णी: प्रतिनिधी

टेंभुर्णी पोलिस स्टेशनमध्ये महिलेने दिलेल्या तक्रारीच्या तपासासाठी  बोलावलेल्या युवकाने  विष प्राशन करून पोलिस स्टेशनमध्ये प्रवेश केला . पोलिस स्टेशनमध्ये त्याला   उलट्याचा त्रास सुरू झाल्याने शेवटी इंदापूर येथे उपचार चालू असताना त्याचे निधन झाले .ही घटना गुरुवारी दुपारी २ वाजता घडली. या घटनेबाबत परिते गावात उलटसुलट चर्चा चालू आहे .

विलास दिलिप भोसले (वय ३५ रा. परिते, ता.माढा) असे मृत झालेल्या युवकाचे नाव असून याबाबत पोलिसांकडून मिळवलेल्या माहिती नुसार परिते येथील एका २७ वर्षीय महिलेने बुधवार दि २२ रोजी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात विलास भोसले याच्या विरुध्द धमकीचा गुन्हा दाखल केला होता. बुधवार दि. २२ रोजी मृत विलास याने तक्रारदार महिलेच्या घरासमोर जाऊन तू माझ्याशी का बोलत नाहीस,तू नाही बोललीस तर तुझे तुकडे तुकडे करीन अशा प्रकारची धमकी दिल्याची तक्रार दिली होती . तक्रारी वरून गुरुवारी   विलास भोसले याला तपासासाठी पोलिसांनी बोलावले  होते. त्यानुसार तो सकाळी पोलीस ठाण्यासमोरआला व  रोगर औषध पिऊन पोलीस ठाण्यात प्रवेश केला.  काही वेळातच त्याच्या उलट्या सुरू झाल्याने  त्याचा भाऊ सीताराम याने टेंभुर्णी  येथील पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र विलास याची प्रकृती गंभीर बनल्याने त्याला इंदापूर येथे खासगी रुग्णालयात दाखलकरण्यात आले.मात्र तेथे उपचार सुरु असतानाच दुपारी २ वाजता त्याचा मृत्यू झाला. 

टेंभुर्णी पोलिस या घटनेच्या मुळाशी जाऊन सखोल तपास करीत आहेत.

दरम्यान मयत तरुणाच्या नातेवाईकांनी मृतदेह टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या आवारात आणून तक्रारदार महिलेच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली होती.रात्री उशिरा पर्यंत प्रक्रिया सुरू होती.