Sun, May 26, 2019 10:37होमपेज › Solapur › डीसीसी बँकेमागील जुगार अड्ड्यावर छापा; ११ अटकेत

डीसीसी बँकेमागील जुगार अड्ड्यावर छापा; ११ अटकेत

Published On: Apr 05 2018 11:06PM | Last Updated: Apr 05 2018 10:36PMसोलापूर : प्रतिनिधी

नवी पेठजवळील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाठीमागील बाजूस एका घरामध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून 11 जुगार्‍यांना अटक  करुन 1 लाख 71 हजार रुपयांची रोकड जप्त केली. ही कारवाई बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास करण्यात आली.

मनोज नेताजी सलगर (वय 35, रा. नवी पेठ, सोलापूर), परेश मधुकर कालेकर (वय 35, रा. पश्‍चिम मंगळवार पेठ, सोलापूर), धानप्पा प्रकाश भद्रे (वय 40, रा. भवानी पेठ, सोलापूर), श्रीराम जाधव (वय 38, रा. सोलापूर), विनायक राजेंद्र शिंदे (वय 34, रा. चौपाड, सोलापूर), शरद शिवाजी जाधव (वय 42, रा. बाळे), हर्षल कोमल बंडगर (वय 32, रा. उत्तर कसबा, सोलापूर), महादेव मनोहर ढगे (वय 40, रा. भवानी पेठ, सोलापूर), विजय विवेक पावले (वय 35, रा. शिवाजीनगर, बाळे, सोलापूर), विश्‍वनाथ आप्पा लकशेट्टी (वय 40, रा. पश्‍चिम मंगळवार पेठ, सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस नाईक दीपक राऊत  यांनी  फिर्याद  दाखल केली आहे.

डॉ. वाघण्णा यांच्या दवाखान्यासमोरील घरात गेल्या अनेक दिवसांपासून जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन सहायक पोलिस निरीक्षक रणजित माने व त्यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी वरील सर्वजण हे 52 पत्त्यांवर पैसे लावून  जुगार खेळताना मिळून आले. पोलिसांनी यावेळी जुगार अड्ड्यातून 1 लाख 71 हजार 320 रुपयांची रोकड जप्त केली असून याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक दिवसे तपास करीत आहेत.