Tue, May 21, 2019 04:46होमपेज › Solapur › दाभोलकरांचे मारेकरी सापडले सूत्रधार पकडा

दाभोलकरांचे मारेकरी सापडले सूत्रधार पकडा

Published On: Aug 21 2018 1:41AM | Last Updated: Aug 20 2018 11:47PMपंढरपूर : प्रतिनिधी

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकर्‍यांना अटक केली असली तरी त्यांच्या खुनातील मुख्य सूत्रधारांनाही अटक करा अशी मागणी करीत येथील तहसीलदार कार्यालयासमोर पंढरपुरातील पुरोगामी संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहेच्या घोषणा देत जोरदार निदर्शने केली. यावेळी निवासी नायब तहसीलदार तिटकारे यांनी निवेदन स्वीकारले. 

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला सोमवारी 5 वर्षे पूर्ण झाली. या पार्श्‍वभूमीवर मागील चार दिवसांत सी.बी.आय.ने डॉ. दाभोळकर यांच्या संशयित मारेकर्‍यांना अटक केली आहे. यावरूनच या मारेकर्‍यांचे सूत्रधार जे कोणी असतील त्यांनाही अटक करा. डॉ. दाभोलकर, डॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांचे मारेकरी एकाच विचाराचे असून या अतिरेकी विचाराच्या व कारवाया करणार्‍या संघटनांवरही बंदी घालण्याची मागणी यावेळी सर्व आंदोलकांनी केली. 

यावेळी मोहन अनपट, संतोष पवार, कीर्तीपाल सर्वगोड, कृष्णा वाघमारे, समाधान फाटे, तानाजी बागल, माउली हळणवर, किरण घाडगे, दीपक वाडदेकर, दत्ता पाटील, नितीन बागल, बी.डी. आरकिले, रवि सर्वगोड, सचिन पाटील, ज्ञानेश्‍वर जवळेकर, नवनाथ माने, ह.भ.प.दत्तात्रय काळे  महाराज, शहाजहान शेख, सुधाकर कवडे, संदीप मांडवे, आकाश मांडवे, भास्कर जगताप, जगदीश पवार आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.