Tue, Jul 23, 2019 02:12होमपेज › Solapur › शासन झोपले नसेल तर गुन्हेगाराला अटक करा

शासन झोपले नसेल तर गुन्हेगाराला अटक करा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

भीमा-कोरेगावमधील घटनेला जबाबदार एकबोटेला अटक केली. भिडे गुरूजींना अटक केली नाही. शासन झोपले आहे का ?, नसेल तर गुन्हेगाराला लवकरात लवकर अटक करा. नाहीतर पुन्हा येत्या अधिवेशनात मोर्चा काढू, असे मत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

शासकीय विश्रामगृह, सात रस्ता येथे मंगळवारी रात्री नऊ वाजता अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्ते आणि माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.पुढे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, भीमा-कोरेगावमधील घटनेच्यावेळी प्रत्यक्षात भिडे गुरूजी तेथे नव्हते. आमचेही तेच मत आहे. परंतु त्यांच्या आदेशावरून त्यांचे कार्यकर्ते तेथे होते. प्रत्यक्षदर्शींनी तसा जबाब दिला आहे. मात्र यातील सत्यता काही समाजकंटक दडवत आहेत. याबाबतचा अहवाल नांगरे-पाटील यांच्यापर्यंत पोहोचला नाही. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणी भिडे गुरूजींचा एक कार्यकर्ता  फेसबुकवर मुख्यमंत्र्यांचा खून करण्याची भाषा करतो. गेल्या 70 वर्षांत असे कधी झाले नाही जे सध्याच्या सरकारच्या काळात सुरू आहे. अशा समाजकंटकांना अटक कधी होणार, असा प्रश्‍न त्यांनी सरकारला यावेळी विचारला. भिडे गुरूजी यांना लवकरात लवकर अटक करावी. त्यांना अटकेपासून वाचवण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ मोर्चे निघणार आहेत. परंतु त्यांना लवकरात लवकर अटक करावी अन्यथा येत्या अधिवेशनात आणखी मोठा मोर्चा काढू, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.

Tags : Criminals get arrested prakash ambedkar 


  •