Tue, Apr 23, 2019 14:12होमपेज › Solapur › शहरातील 62 शाळांवर फौजदारी !

शहरातील 62 शाळांवर फौजदारी !

Published On: Aug 03 2018 1:38AM | Last Updated: Aug 02 2018 11:30PMसोलापूर : दीपक होमकर  

बोगस पटसंख्या दाखवून विद्यार्थ्यांच्या नावाने तांदूळ खाणार्‍या शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सोलापूर महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. उपस्थित विद्यार्थ्यांपेक्षा 50 टक्के अधिक पट दाखविणार्‍या 62 शाळांवर कारवाईचा बडगा उचलला असून त्या शाळांची आता धावपळ सुरू झाली आहे.

राज्य शासनाने 2011 साली राज्यातील सर्व शाळांची एकाच दिवशी पटपडताळणी केली होती. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक बोगस पटसंख्या दाखविणार्‍या शाळांची संख्या उघड झाली होती. शाळेतील अनुदानित वर्ग आणि शिक्षक वाचविण्यासाठी  शाळेत उपस्थित असणार्‍या एकूण विद्यार्थ्यांपेक्षा तब्बल 50 टक्के विद्यार्थी अधिक दाखवून पटसंख्या फुगवली होती.  त्या विद्यार्थ्यांच्या नावे तांदूळही उचलला आहे.  

इतक्या मोठ्या प्रमाणात घेतलेल्या तांदूळाचा अपहार उघड झालेला असतानाही त्या शाळांवर कोणतीच कारवाई झालेली नव्हती. त्यामुळे काही संघटनांनी राज्य शासनाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे न्यायालायने बोगस पटसंख्या दाखविणार्‍या सर्व शाळांविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत.  न्यायालयाचा आदेश प्राप्त होताच शिक्षण संचालकांनी सर्व शिक्षणाधिकार्‍यांना आदेश दिले आहेत. पटपडताळणीच्या दिवशी उपस्थित असलेली विद्यार्थी संख्या आणि शाळांनी दाखविलेला पट यामध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक फरक असेल अशा शाळांनी त्यादरम्यान किती तांदूळ घेतला आहे या संदर्भातील सविस्तर अहवाल तयार करून तो तातडीने शिक्षण संंचालकांकडे पाठविण्याचे आदेशात म्हटले आहे. त्यानुसार मनपा प्रशासनाधिकारी यांनी काम सुरु केले असल्याचे दिसत आहे.

सोलापूर शहरातील नोटीस बजावलेल्या शाळांची नावे
मनपा मराठी शाळा नं. 3, मराठी मुलांची शाळा मोदी, मराठी मुलांची शाळा नं. 6,  मराठी मुलांची शाळा नं. 19, उर्दू मुलांची शाळा 3, उर्दू मुलांची शाळा 6, कन्नड मुलांची शाळा 1, तेलुगु शाळा क्र . 2, तेलुगु शाळा क्र. 1 भाग शाळा, न्यू कस्तुरबा मराठी विद्यालय, गौतम विद्यालय, लोकमान्य विद्यालय, लोणी मराठी शाळा, भीमाशंकर विद्यालय, एस.एस. बडदापुरे विद्यालय, राजहंस प्राथमिक शाळा, सुलाखे विद्यालय, भारत विद्यालय, भोलेनाथ विद्यालय, गोपाळ विद्यालय, वडार समाज प्राथमिक शाळा, श्री महात्मा बसवेश्‍वर प्राथमिक विद्यालय, जवाहर विद्यालय, राजर्षी शाहू विद्यालय, लक्ष्मीबाई म्हेत्रे बालक मंदिर (एसके), उदयविकास विद्यालय, मनोरमा ज्ञानदीप विद्यामंदिर,  ग.ल. कुलकर्णी विद्यालय, हनुमान मराठी विद्यालय, गजानन विद्यालय, कै. रा. थोबडे प्राथमिक शाळा, विकास विद्यालय, लालबहाद्दूर शास्त्री प्राथमिक शाळा, भारतविकास विद्यालय, अमजज्योती विद्यामंदिर, श्री जांबमुनी प्राथमिक शाळा, आंध्र भद्रावती प्राथमिक शाळा, उत्कृष्ट मराठी विद्यालय, टी. एम. पोरे विद्यालय, चेतना मराठी विद्यालय, श्री महात्मा मराठी विद्यालय, ज्ञानविकास प्राथमिक शाळा, महात्मा फुले विद्या मंदिर, सर्वोदय विद्यालय, मंगल मराठी विद्यालय, न्यू कस्तुरबा उर्दू प्राथमिक शाळा, उर्दू शाळा लिमयेवाडी, उत्कृष्ट उर्दू प्राथमिक शाळा,  शास्त्रीनगर उर्दू शाळा, बेगम जाहेदा उर्दू प्राथमिक शाळा, अंजुमन्न ए इस्लाम उर्दू शाळा, इक्बाल उर्दू प्राथमिक शाळा, मल्लिकार्जुन कन्नड प्राथमिक शाळा, महात्मा बसवेश्‍वर कन्नड विद्यालय, नीलकंठेश्‍वर कन्नड प्राथमिक शाळा, श्री महात्मा बसवेश्‍वर कन्नड विद्यालय, मेथाडिस्ट मिशन कन्नड प्राथमिक शाळा, ए. के. बाबालाल उर्दू प्राथमिक शाळा, फराह उर्दू प्राथमिक शाळा, अर्चना तेलुगु प्राथमिक शाळा, श्री स्वामी समर्थ विद्यामिंींर, जीवनज्योती विद्या मंदिर.