Mon, Apr 22, 2019 03:45होमपेज › Solapur › विवाहितेवर बलात्कार करुन फसवणूक करणार्‍यावर गुन्हा

विवाहितेवर बलात्कार करुन फसवणूक करणार्‍यावर गुन्हा

Published On: May 05 2018 12:53AM | Last Updated: May 04 2018 10:46PMसोलापूर : प्रतिनिधी

विवाहितेला गोड बोलून तिच्याशी वेळोवेळी शरीरसंबंध ठेऊन 2 लाख रुपये घेऊन फसवणूक करणार्‍या तरुणाविरुध्द सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युसूफ उस्मान विजापुरे (वय 28, रा. शास्त्री नगर, सोलापूर) असे गुन्हा दाखल  झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित विवाहितेने फिर्याद दाखल केली आहे. 

यातील पीडित विवाहितेला नवर्‍याने सोडून दिल्याने ती मोलमजुरी करुन मुलांसमवेत राहाते. सन 2012 मध्ये पीडित विवाहितेशी युसूफ विजापुरे याने ओळख निर्माण करुन तिच्याशी जवळीकता निर्माण केली. पीडित विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध ठेऊन जबरदस्तीने  बलात्कार केला.  

त्यानंतर पीडितेला गोड बोलून तिच्याकडून वेळोवेळी पैसे घेऊन आतापर्यंत 2 लाख रुपये घेतले. पीडित महिलेने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर पीडितेला जातीवाचक शिवीगाळ करुन तिचे पैसे देण्यास नकार देऊन तिची फसवणूक केली. म्हणून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस आयुक्‍त परशुराम पाटील तपास करीत आहेत.