Wed, Apr 24, 2019 19:31होमपेज › Solapur › अनैतिक संबंधास अडसर; पत्नीचा खून 

अनैतिक संबंधास अडसर; पत्नीचा खून 

Published On: Jan 04 2018 1:04AM | Last Updated: Jan 03 2018 10:14PM

बुकमार्क करा
बार्शी : तालुका प्रतिनिधी 

पांगरी (ता. बार्शी) पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेली खुनाची मालिका काही केल्या थांबेना. नवीन वर्षाच्या दुसर्‍याच दिवशी पांगरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नवविवाहितेच्या खुनाची घटना घडली आहे.
अनैतिक संबंधास अडसर ठरणार्‍या नवविवाहितेचा पतीनेच मारहाणीचा बनाव करून खून करून स्वतः रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याची घटना काल, 2 रोजी मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास येरमाळा-पांगरी मार्गावरील उक्‍कडगाव (ता. बार्शी) शिवारातील  वन विभागाच्या जंगलात घडली. मनीषा महेश मिसाळ (वय 21) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

महेश भारत मिसाळ (रा. खामसवाडी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे खून केल्याप्रकरणी पांगरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. उस्मानाबाद येथील रुग्णालयात पोलिस त्याच्यावर पाळत ठेवून आहेत. दादाराव महादेव फुगारे (वय 45, रा. कोंबडवाडी, ता. जि. उस्मानाबाद) यांनी पांगरी पोलिसांत याबाबत फिर्याद दिली आहे. मनीषा हिचे वडील दादाराव फुगारे यांनी  फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी मनीषाचा विवाह खामसवाडी येथील भारत मिसाळ यांचा लहान मुलगा महेश याच्याबरोबर 7 मे 2017 रोजी झाला होता. विवाहानंतर महेश 
व मनिषा हे पुणे येथे राहण्यासाठी गेल्यावर व वडिलांनी मनिषा हिस फोन केल्यावर ती दडपणाखाली असल्यासारखे जाणवत असे. तिच्याकडे चौकशी केली असता पती महेश हा फोनवर दुसर्‍या मुलीशी बोलत  असल्याचे सांगितले होते व चौकशी केल्यावर शांत बस नाही तर बघ, अशी धमकीही दिली होती. 

मंगळवारी सकाळी फिर्यादीस जावई महेश याने फोन करून कोंबडवाडी येथे पत्नीसह जाऊन भेटून  पाथरी (ता. बार्शी) येथील आपल्या बहिणीकडे जेवणासाठी आला होता. तेथे जेवणखाण  उरकून पुन्हा सासुरवाडी कोंबडवाडी येथे जात  असताना हा प्रकार घडला. महेश व  मनिषा हे दोघे दुचाकीवरून पाथरी येथून पांगरी येथे आले. येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून  उक्‍कडगावमार्गे येडेश्‍वरी येथे देवी दर्शनासाठी दोघे जात असताना येडेश्‍वरी मंदिरापासून दीड कि.मी. अंतरावर असलेल्या जंगलात मनिषा हिच्या डोक्यात, कपाळावर, अंगावर धारदार शस्त्राने मारून तिचा खून करण्यात आला आहे.  मनिषा हिला रस्त्यावरून 500 फूट जंगलातील दरीमध्ये घेऊन जाऊन हा प्रकार करण्यात आला.

अज्ञाताने आम्हा दोघांवर हल्‍ला केल्याचा बनाव केला. पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे पाहून  व माहितीमधील तफावतीचा अंदाज घेऊन हा बनाव  असल्याबाबत शंका व्यक्‍त केली. उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे, सपोनि.धनंजय ढोणे, अमोल माने, मनोज भोसले, शैलैश चौगुले यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. पांगरी पोलिसांत दादाराव फुगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश याच्याविरुद्ध बनान करून पत्नीला जीवे ठार मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी  काही तरुणांना पांगरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सपोनि धनंजय ढोणे करत आहेत.