Sat, Feb 23, 2019 10:15होमपेज › Solapur › बँक लूट प्रकरणातील आरोपीला मतदानास परवानगी

बँक लूट प्रकरणातील आरोपीला मतदानास परवानगी

Published On: Dec 15 2017 6:31AM | Last Updated: Dec 15 2017 6:31AM

बुकमार्क करा

मंगळवेढा : प्रतिनिधी

राज्यभर गाजलेल्या ७० लाख रु बँक दरोडा प्रकरणातील आरोपीला पंढरपूर न्यायालयाने मतदानास परवानगी दिली आहे. पंढरपुर तुरूंगात असलेला आरोपी आणि राष्ट्रवादी युवकचा माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ याच्या गोनेवाड़ी गावाच्या उपसरपंच पदाची निवडणूक आहे. या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी पंढरपुर न्यायालयाने दिली आहे. 

मंगळवेढा तालुक्यातील पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या २० गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत गोनेवाड़ी या गावच्या निवडणुकीत आरोपी रामेश्वर मासाळ हा थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आला होता. त्या नंतर १५ दिवसात येथील बँक ऑफ महारष्ट्र सांगोला शाखेतील पैसे घेवून जाणाऱ्या वाहनावर दिवसा ढवळ्या पूर्वनियोजित पद्धतीने दरोडा टाकला होता. यामध्ये ७० लाख रुपयांची लूट केल्या प्रकरणी अटकेत असलेला मासाळ अटकेत आहे. मतदान हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार असुन मासाळ यास मतदान करण्यास संधी मिळावी असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला होता. यावर न्यायमूर्ती रजपूत डी. यु. यांनी आरोपी मासाळला पोलिस बंदोबस्तात मतदान करण्यास परवानगी दिली आहे.