Wed, Apr 24, 2019 19:36होमपेज › Solapur › पंढरपुरातील संदीप पवार खून प्रकरण, 19 आरोपींना मोक्‍का लागणार 

पंढरपुरातील संदीप पवार खून प्रकरण, 19 आरोपींना मोक्‍का लागणार 

Published On: Apr 29 2018 12:32AM | Last Updated: Apr 29 2018 12:26AMपंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर येथील अपक्ष नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणात आरोपी असलेल्या 19 जणांविरोधात मोक्‍का कायद्यांतर्गत कारवाई होणार आहे. यापैकी सध्या अटकेत असलेले  आरोपी अक्षय ऊर्फ बबलू सुरवसे, याच्यासह 5 आरोपींना मोक्‍कांतर्गत पुणे येथील मोक्‍का न्यायालयाचे न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी 7 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर मुख्य सूत्रधार मानल्या जात असलेल्या भाजप जि. प. सदस्य गोपाळ अंकुशरावसह इतर 13 जणांवरही लवकरच कारवाई होणार असल्याचे समजते. 

पंढरपूरचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांचा 18 मार्च रोजी येथील  हॉटेल श्रीराममध्ये गोळ्या घालून धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी  धडक  कारवाई  करून 13 आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये भाजपचा गोपाळपूर जि.प.सदस्य गोपाळ अंकुशराव याचाही समावेश आहे. या प्रकरणातील अक्षय ऊर्फ बबलू सुरवसे, पुंडलिक वनारे, मनोज शिरसीकर, भक्‍तराज धुमाळ, बंडू ऊर्फ नितीन बारंगुळे यांच्यासह तब्बल 19 जणांना मोक्‍का लावला आहे. या 19 जणांपैकी अक्षय सुरवसे, पुंडलिक वनारे, मनोज शिरसीकर, भक्‍तराज धुमाळ, नितीन बारंगुळे या पाच आरोपींना पुणे येथील विशेष मोक्‍का न्यायालयात शुक्रवार दि. 27 एप्रिल रोजी हजर करण्यात 
आले होते. 

त्यावेळी विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश जे. टी. उत्पात यांनी 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या मोक्कांतर्गत गुन्ह्याचा तपास अकलूज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण हे करीत आहेत. आरोपींतर्फे अ‍ॅड. ज्ञानेश्वर मोरे, अ‍ॅड. विद्याधर कोशे, अ‍ॅड. चेतन बोचरे आदींनी काम पाहिले.

Tags : Corporator , Sandeep Pawar,  Murder Case, Accused,Pandhrpur