Mon, Aug 19, 2019 05:28होमपेज › Solapur › सोसायट्या समृद्ध झाल्याशिवाय सहकार समृद्ध होणार नाही

सोसायट्या समृद्ध झाल्याशिवाय सहकार समृद्ध होणार नाही

Published On: Apr 21 2018 1:04AM | Last Updated: Apr 20 2018 10:14PMहोटगी : प्रतिनिधी

सहकार क्षेत्र समृध्द करण्याचे स्वप्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आहे, सहकार समृध्द झाल्याशिवाय महाराष्ट्र समृध्द होणार नाही. सहकार समृध्द करण्यासाठी सोसायट्या समृध्द करणं आवश्यक आहे, जोपर्यंत सोसायट्या समृध्द होत नाहीत, तोपर्यंत खर्‍या अर्थाने सहकार क्षेत्र समृध्द होणार नसल्याचे मत ना. सुभाष देशमुख यांनी व्यक्‍त केले. ते गुंजेगाव इथल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्प सन 2017/18 अंतर्गत रस्त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हणमंत कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मोरे, उपअभियंता महेंद्र उंबरजे, गुरण्णा तेली, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष प्रशांत कडते, सहाय्यक निबंधक वाघमारे, पंचायत समिती सदस्य महादेव कमळे, गावडेवाडीचे सरपंच सुखदेव गावडे आदी उपस्थित होते. ते पुढे बोलताना म्हणाले की, राज्यातील साडेआठशे सोसायट्यांनी शासनाची मदत न घेता स्वनिधीवर आपापला व्यवसाय सुरू केला आहे. आगामी काळामध्ये तालुक्यातील प्रत्येक सोसायट्यांनी कोणताही एक व्यवसाय सुरू करावा. सोसायट्या स्वावलंबी झाल्या पाहिजेत, त्यामुळे गावातील पैसा गावात राहणार आहे, गावातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी ना. देशमुख यांच्या उपस्थितीत गुंजेगावचे वारकरी पवार यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. यामध्ये बोराळे, सिध्दापूर, वडापूर, अंत्रोळी, कंदलगाव, गुंजेगाव ते प्रमुख राज्यमार्ग 6 ला जोणारा रस्ता, राज्य महामार्ग क्र.203 ते गुंजेगाव, मनगोळी, वांगी, वडकबाळ, राज्य महामार्गाला जोडणार्‍या रस्त्याचे भूमीपूजन करण्यात आले. कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मोरे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस हणमंत कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच संतोष पवार यांनी केले. सूत्रसंचालन कापसे यांनी, तर ग्रामसेवक दयानंद पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमास भाजपाचे तालुका सरचिटणीस यतिन शहा, माजी सरपंच मोहन पवार, अभिमन्यू पवार, ग्रा.पं. सदस्य अंगद पवार, गौरीशंकर मेंडगुदले, सौदागर आठवले, वांगीचे सरपंच बाबा हांडे, प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी गुंजेगाव, गावडेवाडी, वांगी येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Tags : Solapur, Cooperation, enriched, unless, societies,  prosperous