Wed, Sep 26, 2018 10:13होमपेज › Solapur › थंडीत वाढ झाल्याने सोलापूरकर गारठले 

थंडीत वाढ झाल्याने सोलापूरकर गारठले 

Published On: Jan 10 2018 2:00AM | Last Updated: Jan 09 2018 11:36PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

सोलापुरातील थंडीमध्ये वाढ झाल्याने शहरवासीय गारठून गेले आहेत. केवळ रात्रीच्या वेळीच नव्हे, तर दिवसाही थंडी असल्याचे जाणवत आहे.

दिवाळीच्या कालावधीत थंडी नव्हती. नोव्हेंबरपासून थंडीला सुरुवात झाली; मात्र या थंडीत सातत्य नव्हते. काही दिवस थंडी जाणवायची, तर काही दिवस थंडी नसल्याचे जाणवत होतेे. हवामान बदलातील या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर चांगलाच परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. सर्दी, थंडीताप, खोकला आदी आजार बहुतांश लोकांना जडल्याची माहिती आहे. एकीकडे उपचारासाठी दवाखान्यात तसेच स्वेटर, कानटोपी, जर्किन खरेदीसाठी बाजारात लोकांची गर्दी असल्याचे दिसून येत आहे. 

थंडीचा प्रभाव सायंकाळपासून जाणवण्यास सुरुवात होते. रात्रीच्या वेळी ती वाढत जाऊन पहाटेच्या वेळी कडाक्याची थंडी पडत असल्याचा अनुभव सर्वांना येत आहे. 
सकाळी थंडी कमी होत असली तरी ती जाणवत आहे. दुपारच्या वेळी ऊन कडक नसल्याने दुपारच्या वेळीही थंडीचा प्रभाव जाणवत आहे. महाशिवरात्रीनंतर थंडी कमी होऊन उन्हाळ्यास सुरुवात होते.