Tue, Mar 19, 2019 11:20होमपेज › Solapur › योग्य नियोजनामुळेच करमाळा शहरास अखंड पाणीपुरवठा : फंड

योग्य नियोजनामुळेच करमाळा शहरास अखंड पाणीपुरवठा : फंड

Published On: Jun 06 2018 1:44AM | Last Updated: Jun 05 2018 10:32PMकरमाळा : तालुका प्रतिनिधी   

करमाळा शहराला उजनीच्या काठावरील दहिगाव येथून पाणी पुरवठा करण्यात येतो. या पाणी पुरवठा व्यवस्थेचे योग्य नियोजन केल्यानेच विजेचा लंपडाव असला तरी संपूर्ण तीव्र उन्हाळ्यात योग्य व पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करणे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन पाणी पुरवठा सभापती स्वाती फंड यांनी केले.

करमाळा शहराला अविरतपणे पाणी पुरवठा करणार्‍या दहिगाव पंपहाऊसला करमाळा शहराच्या नगरसेविका पाणी पुरवठा सभापती स्वाती फंड यांनी भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या. 
यावेळी महादेव फंड, कमलाकर भोज, भरत आवटे, बाळू शिंदे आदी उपस्थित होते.

तीव्र उन्हाळ्यातही करमाळा शहराला पाण्याची कुठल्याही प्रकारची टंचाई भासू नये तसेच करमाळा  शहरातील नागरिकांना योग्य दाबाने व नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी नगरसेविका स्वाती फंड यांनी नियोजनपूर्वक व्यवस्था केली होती.

वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याने ऐन उन्हाळ्यात कुठल्याही प्रकारचा व्यत्यय पाणी पुरवठ्यात आला नाही. त्यामुळे करमाळा शहराला नियमित योग्य दाबाने पाणीपुरवठा झाला आहे. आपल्याला दिलेल्या पदाचा उपयोग नागरिकांच्या कल्याणासाठी करुन कुशल  कार्याने संपूर्ण शहराला पाण्याची चणचण नगरसेविका स्वाती फंड यांनी भासू न दिल्याने नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. करमाळा शहराला ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा करणारे  नगरपालिका कर्मचारी कमलाकर भोज, भारत आवटे, बाळू शिंदे यांचे नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे.
सध्या उजनीच्या पाण्याची पातळी खालावत चालली असून पुणे जिल्ह्यात पाऊस न झाल्यास व पाणी पातळीत वाढ न झाल्यास पुन्हा वेगळे नियोजन आखत असल्याचे सभापतींनी यावेळी सांगितले.