Sat, Mar 23, 2019 12:01होमपेज › Solapur › महागाई विरोधात सांगोला येथे काँग्रेसचा मोर्चा

महागाई विरोधात सांगोला येथे काँग्रेसचा मोर्चा

Published On: Feb 02 2018 11:46PM | Last Updated: Feb 02 2018 11:37PM घेरडी: वार्ताहर

गॅस सिलिडर आणि  पेट्रोल- डिझेल दरामध्ये झालेल्या दरवाढीचा धसका सर्वसामान्य जनतेने घेतला असून यांचे  शासनाला घेणे देणे नाही. त्यांच्या निषेधार्थ सांगोला तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने भव्य ढकल मोटर सायकल मोर्चा सांगोला तहसील कार्यालयावर काढण्यात आला. दिवस-रात्र काबाड कष्ट करणार्‍या शेतकर्‍यांच्या शेती पिकांना योग्य हमीभाव देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.  म.फुले चौकात राष्ट्र पुरुष महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे पूजन करून या ढकल मोर्चाला सुरुवात झाली.

देशभरात महागाईचा आगडोंब पसरला आहे. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रचंड वाढ सुरू आहे. घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये तर तब्बल 19 वेळा वाढ झालेली आहे.  वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले असल्याने सांगोला तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजकुमार पवार, जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी भाजप सरकारच्या धोरणे आणि कायदे सामान्य जनतेच्या विरोधात असल्याचा आरोप केला.  तहसील कार्यालयच्या उपस्थित अधिकार्‍यानां निषेधाचे निवेदन देण्यात आले.  या मोर्चासाठी ज्ञानेश्वर कोळसे पाटील, तोहिद मुल्ला, चाँदभैय्या शेख, सुनेत्राताई लोहार, प्रविण गायकवाड यांच्यासह सांगोला तालुक्यातील काँग्रेसप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.