Sun, Apr 21, 2019 06:33होमपेज › Solapur › सोलापूर : मुख्यमंत्र्यांसह सहा जणाविरुध्द तक्रार दाखल 

सोलापूर : मुख्यमंत्र्यांसह सहा जणाविरुध्द तक्रार दाखल 

Published On: Jun 10 2018 7:16PM | Last Updated: Jun 10 2018 7:16PMसोलापूर : प्रतिनिधी

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून खोटे आश्वासन देवून मराठा समाजाची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यासह सहा जणांविरुध्द राष्ट्रीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पवार यांनी तक्रार दाखल केली आहे. फसवी योजना काढून कर्ज देतो म्हणून खोटे आश्वासन देवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पवार यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून राज्य शासनाच्यावतीने कर्ज देण्याची योजना सुरू केली. या योजनेच्या राज्य शासनाच्या अध्यादेशास व जाहिरातीस वरून पवार यांनी दहा लाख कर्जासाठी ऑनलाइन फॉर्म भरला होता. हा फॉर्म भरल्यानंतर मिळालेले पात्रता प्रमाणपत्र घेवून ते बँकेमध्ये गेले. परंतु, बँकेने यासंबंधीचे शासनाचे कोणतेही आदेश नसल्याने कर्ज देण्यास नकार दिला. 

शासनाने अशा प्रकारे फसवी योजना काढून कर्ज देतो म्हणून खोटे आश्वासन देवून आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप करत राष्ट्रीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, त्याचबरोबर शिवसेना नेते एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख, संभाजी निलंगेकर यांच्याविरुध्द भां.द. वी. कलम 409, 415, 420, 422, 423, 463, 464, 467, 468, 471 व सह 34 अन्वये तक्रार दिली.