होमपेज › Solapur › सहकारमंत्र्यांच्या ‘लोकमंगल’ने १२ कोटींचे अनुदान लाटले

सहकारमंत्र्यांच्या ‘लोकमंगल’ने १२ कोटींचे अनुदान लाटले

Published On: Jan 31 2018 2:07AM | Last Updated: Jan 30 2018 9:47PMसोलापूर : प्रतिनिधी  

राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आपला मुलगा चेअरमन असलेल्या लोकमंगल मल्टिस्टेेट को-ऑप. सोसायटीला दुग्ध भुकटी पावडर प्रकल्प मंजूर करून त्याचे 12 कोटी रुपयांचे अनुदान लाटल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य आप्पाराव कोरे यांनी केला आहे.

शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीस 10 मेट्रिक टन क्षमतेचा दूध भुकटी प्रकल्प तसेच 50 हजार लिटरवरून 1 लाख लिटर क्षमतेच्या दुग्धशाळेच्या विस्तारीकरणासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आपले राजकीय वजन वापरून हे अनुदान मिळविले असल्याचा आरोप कोरे यांनी केला आहे. ज्या संस्थेला हा प्रकल्प मंजूर झाला आहे त्या संस्थेमध्ये देशमुख यांचा मुलगाच अध्यक्ष आहे. असा आरोप कोरे यांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची चौकशी करावी, अशी मागणी कोरे यांनी यावेळी लावून धरली. यावेळी संगमेश बगले उपस्थित होते.