होमपेज › Solapur › सोलापुरात बंदला प्रतिसाद नाही

सोलापुरात बंदला प्रतिसाद नाही

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी 

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंध कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात देशातील विविध दलित संघटना आणि आदिवासी संघटनांनी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. याला सोलापुरात प्रतिसाद मिळाला नाही. काही दलित संघटना व बहुजन समाजवादी पक्षाच्या वतीने यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. सोमवारी बँका बंद होत्या, तर इतर कोणत्याही व्यवहारावर या बंदचा परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे सोलापुरातील दिवसभरातील जनजीवन सुरळीत होते. काही संघटनांनी सोलापुरात एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर याविरोधात घोषणाबाजी केली आणि जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले. 


  •