Sat, Sep 22, 2018 23:05होमपेज › Solapur › स्वच्छता अभियानाची गोल्डन बुक आँफ वर्ल्डमध्ये नोंद

स्वच्छता अभियानाची गोल्डन बुक आँफ वर्ल्डमध्ये नोंद

Published On: Jan 08 2018 1:16AM | Last Updated: Jan 07 2018 9:47PM

बुकमार्क करा
 

वेळापुर : वार्ताहर

राज्यातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, उस्मानाबाद या राज्यात जैन समाजासाठी कार्यरत असणार्‍या श्री सन्मती सेवा दलातील सुमारे 325 युवक युवतींनी या स्वच्छता अभियानात भाग घेतला असलेची माहिती श्री सन्मती सेवा दलाचे अध्यक्ष नवजीवन दोशी यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना दिली. झारखंड राज्यातील सन्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र आहे. या सन्मेद शिखरजींना एकदा वंदन करण्याचे प्रत्येक जैन बांधवाचे स्वप्न असते. सन्मतीसेवा दलाच्यावतीने स्वच्छता अभियान राबविले जात आहे. या स्वच्छता अभियानाची दखल घेऊन गोल्डन बुक आँफ वर्ल्डचे एशिया हेड डॉ.मनिष वैष्णोई प्रातिनिधिक  प्रमाणपत्र सन्मती सेवा दलातील या स्वच्छता अभियानातील युवक युवतींना देणेत आले. 

या अभियानाच्या यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष मिहिर गांधी यांचे मार्गदर्शनाखाली विद्यमान अध्यक्ष नवजीवन दोशी (वेळापूर), उपाध्यक्ष निनाद चंकेश्‍वरा, महावीर दोशी, संयोजक संदेश गांधी, जितेंद्र दोशी, मयुर  गांधी, अमित गांधी आदी  सदस्यांनी परिश्रम घेतले.