Mon, Aug 19, 2019 07:14होमपेज › Solapur › बंकलगी, आहेरवाडी बससेवा सुरू; नागरिकांतून समाधान

बंकलगी, आहेरवाडी बससेवा सुरू; नागरिकांतून समाधान

Published On: Jan 07 2018 2:04AM | Last Updated: Jan 06 2018 11:14PM

बुकमार्क करा

होटगी : प्रतिनिधी

आहेरवाडी आणि बंकलगी गावांची बससेवा चालू केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्‍त केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बंकलगी, आहेरवाडी गावची बस बंद झाल्याने विद्यार्थी आणि नागरिकांचे मोठे हाल होत होते. याबाबत गावभेट दौर्‍याप्रसंगी ना. सुभाष देशमुखांना याबाबत सांगण्यात आले होते. याची दखल घेत ना. देशमुखांनी बंकलगी आणि आहेरवाडी बससेवा सुरू करून नागरिकांना दिलासा दिला असल्याचे आहेरवाडीचे ग्रामस्थ रामेश्‍वर हिप्परगी आणि काझी यांनी सांगितले.

यावेळी बंकलगीचे ग्रामस्थ माणिकराव देशमुख यांनीदेखील गावाला बससेवा सुरू केल्यामुळे ना. सुभाष देशमुख आणि सोलापूर परिवहन समितीचे सभापती दैदिप्य वडापूरकर यांचे आभार मानले. यावेळी बंकलगी ते अरविंद धाम बससेवा सुरू करण्यात आल्याने गावकर्‍यांच्या वतीने वाहतूक नियंत्रक, बसचे वाहक, चालक यांचा सत्कार करण्यात आला. ही बससेवा सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत सेवेत राहणार असून ही बस बंकलगी येथे मुक्‍कामी राहणार आहे. यामुळे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी यांना त्याचा चांगला फायदा होणार आहे.

या बससेवेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, अवैध जीप, टमटम अशा वाहनातून न जाता महापालिकेच्या बसने सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन सोलापूर परिवहन समितीचे सभापती दैदिप्य वडापूरकर यांनी नागरिकांना केले. याप्रसंगी परिवहन सभापती यांनी स्वत: तिकीट काढून आहेरवाडी ते बंकलगी तीन किमी बसने प्रवास करून बंकलगीच्या कार्यक्रमास हजेरी लावली. या कार्यक्रमास आहेरवाडीच्या सरपंच लक्ष्मीबाई पाटील, उपसरपंच नासिर काझी, पंडित पाटील, काशिराया बोरूटे, माणिकराव देशमुख, बंकलगीच्या उपसरपंच इंदुमती काळे, नागेंद्र कुंभार, संकेत किल्लेदार, प्रदीप घागरे, संगण्णा कोणदे, शिश्ाुपाल देशमुख, रणजित देशमुख, महादेव रामपुरे आदी उपस्थित होेते.