Wed, Nov 21, 2018 17:25होमपेज › Solapur › श्रीपूरमध्ये निघाली बाल वारकर्‍यांची दिंडी

श्रीपूरमध्ये निघाली बाल वारकर्‍यांची दिंडी

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 18 2018 10:31PMश्रीपूर : सुखदेव साठे

खांद्यावर फडफडणार्‍या भगव्या पताका,कपाळी गंध , हातात टाळ,संतांच्या व वारकर्‍यांची वेशभूषा परिधान करून ग्यानबा-तुकाराम व माऊली माऊलीचा  जयघोष करीत श्रीपूर येथील चंद्रशेखर जि.प. शाळा व इंदिराबाई आगाशे इंग्लिश स्कुलच्या सुमारे 1000 हजार विद्यार्थ्यां पालखी सोहळा काढला. या पालखी सोहळ्याचे हे 21 वे वर्ष असून अखंडितपणे ही परंपरा चालु आहे. 

सुरुवातीला पालखीतील पादुकांचे पूजन करून पालखीचे प्रस्थान करण्यात आले. पालखी कर्मयोगी निवासस्थानाजवळ येताच त्या ठिकाणी अश्वाचे गोल रिंगण घेण्यात आले. या सोहळ्यात आरोग्य पथक,स्काऊट क्लब दिंडी,वृक्ष दिंडी, भजनी दिंडी,संतांच्या वेशभूषेतील दोन चित्ररथ अशा एकूण 25 दिंडयामधुन 1000 बालवारकर्‍यानी सहभाग घेतला होता.  

पालखी श्रीपूरमधील कर्मयोगी कामगार कॉलनी,गणेश हॉल पासून पांडुरंग कारखाना प्रवेशद्वार तसेच संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरून पुढे शिवाजी चौकातून श्रीनगर कॉलनीत नेण्यात आली. पांडुरंग कारखाना व जागृती तरुण मंडळाच्यावतीने मुलाना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षक,शिक्षिका व महिलांनी फुगड़ी खेळून आनंदत्सव साजरा केला. पालखी प्रकाशनगर मार्गे जात शाळेच्या मैदानावर विसावली. पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी  जि.प. च्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव व इंदिराबाई स्कुलचे मुख्याध्यापक सुरेश खडतरे यांनी परिश्रम घेतले.