Fri, Jul 19, 2019 19:52होमपेज › Solapur › चारा छावणीतील दोषींवर कारवाई करा : कदम

चारा छावणीतील दोषींवर कारवाई करा : कदम

Published On: Dec 12 2017 3:04PM | Last Updated: Dec 12 2017 3:52PM

बुकमार्क करा

सोलापूरः प्रतिनिधी  

सांगोला तालुक्यातील सन 2013 च्या चारा घोटाळ्यासंदर्भात दोषी असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रफुल्ल कदम यांनी केली. या विषयी चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, आशिष शेलार यांनी नागपूर हिवाळी आधिवेशनामध्ये लक्ष्यवेधी सूचना मांडली  होती. आता हेच विरोधी पक्ष नेते त्याच खात्याचे मंत्री झाले, तरी दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करत नाहीत. याचा निषेध म्हणून या हिवाळी अधिवेशनापर्यत दोषी अधिकार्‍यांवर कारवाई न झाल्यास अधिवेशनानंतर थेट मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कदम यांनी दिला.

सांगोला तालुका चारा छावणी घोटाळ्याबाबत तत्कालीन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम, विभागीय अधिकारी बाबासाहेब बेलदार, तहसिलदार नागेश पाटील आदी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दोषानुसार जबाबदारी निश्‍चित करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी प्रफुल्ल कदम यांनी शासनाकडे पुन्हा एकदा केली आहे. दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्यासाठी प्रफुल्ल कदम सन 2013 पासून पाठपुरावा करीत आहेत. पुरावे अत्यंत भक्कम असल्याने प्रशासनावर विश्‍वास ठेवून न्यायालयाकडे न गेल्याचे प्रफुल्ल कदम यांनी सांगितले.