Tue, Apr 23, 2019 09:33होमपेज › Solapur › पंढरपूर न.प.च्या वतीने चंद्रभागा नदी वाळवंटात विशेष स्वच्छता मोहीम

पंढरपूर न.प.च्या वतीने चंद्रभागा नदी वाळवंटात विशेष स्वच्छता मोहीम

Published On: Jan 15 2018 1:45AM | Last Updated: Jan 14 2018 9:36PM

बुकमार्क करा
 पंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर शहरामध्ये दि.28 जानेवारी 2018 रोजी माघी यात्रा भरत असुन यात्रेपूर्वी शहरातील विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. पंढरपूरचे नूतन उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी माघी यात्रा नियोजनाबाबत बैठक आयोजित केली होती. 

या बैठकीमध्ये शहरातील व नदी पात्रातील स्वच्छता मोहीम हाती घेण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले, आरोग्य समितीचे सभापती अनुसया शिरसट, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रभागा वाळवंटातील विशेष स्वच्छता मोहीम राबवून 200 सफाई कर्मचार्‍यांकडून चंद्रभागा वाळवंटातील स्वच्छता करण्यात आलेली आहे.

यात्रा कालावधीतसुद्धा 65 एकर (भक्‍तीसागर), चंद्रभागा नदी वाळवंट, पत्रा शेड येथे जास्तीत जास्त सफाई कर्मचार्‍यांची नेमणूटक करून शहरातील स्वच्छता करण्यात येणार असल्याचे उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर व आरोग्य अधिकारी डॉ.संग्राम गायकवाड यांनी सांगितले. सदरची विशेष स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी  आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर,बर्मा पवार, कुमार भोपळे, मारुती मोरे हे प्रयत्नशील आहेत.