Sun, Aug 25, 2019 08:12होमपेज › Solapur › सगळ्यांचा मुहूर्त लागला; सोलापूर मात्र वेटिंगवरच

सगळ्यांचा मुहूर्त लागला; सोलापूर मात्र वेटिंगवरच

Published On: Dec 13 2017 7:25PM | Last Updated: Dec 13 2017 7:29PM

बुकमार्क करा

सोलापूर : श्रीकांत साबळे

बहुचर्चित उड्डान योजनेंतर्गत महाराष्ट्रातील कोल्हापूर, जळगाव आणि नाशिक येथील विमानेसवा सुरू करण्यास मुहूर्त मिळाला आहे. त्या तुलनेत सोलापूरला यावर्षी अखेरपर्यंत मुहूर्त मिळणार नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत असून याला स्थानिक प्रशासकीय यंत्रणाच जबाबदार असल्याचा सूर आता उमटत आहे.

केंद्र सरकारने स्वस्तात विमानसेवा सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उड्डान योजनेची घोषणा केली होती. या योजनेत महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक, जळगाव, सोलापूर आणि नांदेड या प्रमुख पाच शहरांचा समावेश केला होता. ही योजना प्रथमत: सप्टेंबरपासून सुरू करण्याची घोषणा झाली होती; परंतु तांत्रिक कारणांमुळे यास विलंब झाला. आता सोलापूर वगळता अन्य शहरांतील विमानतळांवरील सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यात आला असून या ठिकाणी येत्या काही दिवसांत डेक्कन एअर या विमानसेवा पुरविणार्‍या कंपनीकडून सेवा सुरू करण्यात येणार आहे. प्राप्त माहितीनुसार कंपनीकडून येत्या 23 डिसेंबरपासून नाशिक, जळगावसाठीची, तर 24 पासून कोल्हापूरची सेवा सुरू केली जाणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आज कंपनीकडून करण्यात आली आहे, तर नांदेडची सेवा यापूर्वीच सुरू झालेली आहे. त्यामुळे आता सोलापूरच्या लटकलेल्या विमानसेवेला मुहूर्त कधी, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

सोलापूरहून विमानसेवा सुरू करण्यासाठीची सर्व तयारी स्थानिक पातळीवर करण्यात आली आहे. परंतु, सिद्धेेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीमुळे ही सेवा सुरू करण्यास तांत्रिक अडचण येत असल्याचा अहवाल एअर डेक्कनकडून एअरपेार्ट अ‍ॅथोरिटीला पाठविण्यात आला आहे. त्यामुळे जोपर्यंत चिमणीचा अडसर दूर होत नाही तोपर्यंत सोलापूरच्या विमानसेवेला मुहूर्त लागणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.